उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता खांद्याला खांदा लावून सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात लढा लढत असताना आता महाविकास आघाडीत मनसे सामील होईल अशी चर्चा सुरु आहे. मात्र ही चर्चा सुरु असतानाच काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आम्ही ना उद्धव ठाकरेंसोबत जाणार, ना राज ठाकरेंसोबत असं विधान करत आपला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसने (Congress)हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यानंतर भाई जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

“मी 3 वर्ष मुंबईचा अध्यक्ष होता तेव्हाही माझी हीच भूमिका होती. फक्त मीच नाही तर मुंबईतील सर्व नेत्यांची काँग्रेसने स्वबळावर लढां अशी भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्ता आयुष्यभर पक्षाचा झेंडा घेऊन फिरत असतो, आपल्या वॉर्डात, पंचायत समिती गटात, नगरपालिकेत फिरत असतो. त्याला अपेक्षा असते की, आपल्या नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना संधी मिळावी. त्यांचा हा विचार योग्य आहे,” असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, “गेल्या आठवड्यात मुंबई काँग्रेसची (Congress)राजकीय व्यवहार समितीची बैठक झाली. या बैठकीत मुंबईचे जनरल सेक्रेटरी इनचार्ज रमेशजी उपस्थित होते. त्यांनी विचारलं तेव्हा मी माझं मत सांगितलं की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढायला हव्यात. समितीत 15 लोक असून बहुतेक लोकांनी हेच मत मांडलं आहे. मी पक्षाचा प्रमुख नसल्याने माझं मत म्हटलं आहे. उगाच गुगल्या टाकू नये”.

“मी मुंबईचा अध्यक्ष असतानाची आणि आताची भूमिका यात कोणताही बदल झालेला नाही. निवडणुकीसाठी आम्ही कोणासोबत जावं किंवा नाही याबाबत हायकमांड निर्णय घेत असतं. आता वर्षा गायकवाड प्रमुख आहेत. पक्षाची भूमिका पक्षाच्या प्रमुखाने ठरवायची असते. पण आमची मतं विचारली जातात, तेव्हा आम्ही फक्त आमची मतं मांडत असतो,” असं त्यांनी म्हटलं आहे.

“पक्षाच्या प्रमुखांकडून आमच्या भूमिका, विचार विचारले जातात. ते 100 टक्के स्विकारावं असं नाही. काँग्रेस म्हणून एकटं लढून नंतर युती करु शकतो. महाविकास आघाडीचं सरकार असतानाही मी विरोधी पक्षात होतो. महानरपालिकेत माझा विरोधी पक्षनेता होता. 5 वर्ष सातत्याने रवी राजा विरोधी पक्षनेते होते. पक्षाचे प्रमुख विचारतात तेव्हा आमची भूमिका आम्ही मांडतो. पक्षाने निर्णय घेतल्यानंतर आमच्या मताला महत्त्व राहत नाही,” असंही ते म्हणाले.

भाई जगताप यांनी म्हटलं होतं की, “आम्ही अजिबात यांच्यासोबत लढणार नाही. राज ठाकरे सोडा आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा छातीठोकपणे हे (Congress)सांगितलं आहे. ही कार्यकर्त्याची लढाई असून, त्याला ती लढू दे. आम्ही ना शिवसेनेसोबत गेलं पाहिजे, उद्धव ठाकरेंसोबत गेलं पाहिजे. राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही”. मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढणार आणि लढलंच पाहिजे. आम्ही समितीसमोर हा मुद्दा मांडला आहे असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

हेही वाचा :

काकांनी केला 3 वर्षीय मुलीवर बलात्कार, गुप्तांगातून रक्त अन्…

“बॉलिवूडमध्ये सेक्सिझम अस्तित्वात…”, करीनाच्या वक्तव्याने सिनेसृष्टीत खळबळ

आता तुमच्या मुलाचंही पीएफ खातं उघडता येणार; जाणून घ्या योजना…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *