कल्याण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात बोरगावकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या सोबत असलेले शिवसेना कार्यकर्ते ज्ञानेश्वर सपाट आणि ओंकार सपाट यांनाही मारहाण(Attack) झाल्याचे समजते.ही घटना कल्याणमधील शिवसेना कार्यालयासमोर घडली. माहिती नुसार, कार्यालयाबाहेर दोन गटांत वाद झाला होता. उमेश बोरगावकर यांनी हा वाद मिटवून जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेत असताना अंधाराचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर मोठमोठे दगड फेकून हल्ला केला.

हल्ल्यामुळे कारच्या पुढील आणि मागील काचा चक्काचूर झाल्या आहेत. गाडीत पडलेले दगड आणि फुटलेल्या काचा पाहून हल्ल्याची तीव्रता लक्षात येते. या घटनेनंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले(Attack) होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बोरगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले गेले असून, हल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात घेतले जात आहे. हल्ला जुन्या वादातून झाला की त्यामागे राजकीय सूडाचा भाग आहे, हे स्पष्ट होणे बाकी आहे.

या घटनेनंतर कल्याणमधील शिवसैनिकांत प्रचंड रोष पसरला असून, हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा तपासासाठी खास पथक नेमले आहे.सध्या जखमी असलेले उमेश बोरगावकर, ज्ञानेश्वर सपाट आणि ओंकार सपाट यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा :

“भुजबळांची ‘अक्कल दाढ’ पडली, बुद्धी गेली…”; जरांगे पाटलांचं भुजबळांना जहाल प्रत्युत्तर!

आज धनत्रयोदशीला या राशींना मिळणार लाभ…

अपराजिताच्या फूलाचे आरोग्यदायी रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल…!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *