बॉलिवूड अभिनेत्री(actress) करीना कपूर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने चित्रपटसृष्टीतील कथित वयवाद आणि लैंगिक भेदभावावर आपले मत मांडले. तिच्या मते, अशा चर्चा केवळ सोशल मीडियावर होतात, वास्तवात गुणवत्ताच महत्त्वाची ठरते.मुलाखतीत करीनाला विचारण्यात आले की, लग्नानंतर किंवा चाळिशीनंतर अभिनेत्रींना भूमिका मिळणे कठीण होते का? यावर उत्तर देताना तिने सांगितले की, ही केवळ चर्चेपुरती मर्यादित बाब आहे. अनेक अभिनेत्री आजही यशस्वीपणे काम करत आहेत. तिने ठामपणे सांगितले की, “जर तुमच्याकडे प्रतिभा असेल, तुम्ही चांगले दिसत असाल आणि स्वतःवर विश्वास असेल, तर तुम्हाला काम मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.”

वय हा केवळ एक आकडा असून, प्रत्येक वयोगटातील कलाकार उत्तम कामगिरी करत असल्याचे तिने नमूद केले. स्वतःचे उदाहरण देताना ती म्हणाली की, ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ती पाच महिन्यांची ग गर्भवती होती. तसेच, आलिया भट्ट (actress)देखील गरोदर असताना काम करत होती. त्यामुळे आव्हान स्वीकारून या तथाकथित मर्यादा तोडायला हव्यात, असे तिने स्पष्ट केले.सध्या सोशल मीडियावर चित्रपटांवर टीका करणे आणि ‘बॉयकॉट’ ट्रेंड चालवण्यावरही करीनाने आपले मत मांडले. तिच्या मते, आजकाल प्रत्येकाला विविध माध्यमांवर आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, पण प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज नाही. “प्रत्येकाचे मत असते, पण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे,” असा सल्ला तिने दिला.

जर चित्रपट खरोखरच चांगला असेल, तर प्रेक्षक तो पाहण्यासाठी नक्कीच जातील, असा विश्वास तिने व्यक्त केला. सोशल मीडियावरील नकारात्मकतेला मागे टाकण्यासाठी चित्रपट उत्कृष्ट असणे गरजेचे आहे, असे ती म्हणाली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील यशापयशात जास्त काळ अडकून न राहता, आपण पक्ष्याप्रमाणे पुढे निघून जातो, असेही तिने एका मजेशीर प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

हेही वाचा :

आता तुमच्या मुलाचंही पीएफ खातं उघडता येणार; जाणून घ्या योजना…

ऐन दिवाळीत आगीत होरपळली ‘ही’ अभिनेत्री, वडिलांनी वाचवले प्राण…

तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्…, VIDEO तुफान व्हायरल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *