तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कॅमिनेनी(good)यांनी दुसऱ्या बाळाच्या आगमनाची आनंदाची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी इंस्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला, ज्यात उपासनाला पाहुण्यांकडून भेटवस्तू आणि आशीर्वाद दिले जाताना दाखवले आहे.व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, “Double the joy, double the love, double the blessings”, ज्याचा अर्थ आहे – दुहेरी आनंद, दुहेरी प्रेम आणि दुहेरी आशीर्वाद. व्हिडिओच्या शेवटी “नवीन प्रारंभ” असा कॅप्शन दिले आहे.

राम चरण आणि उपासना यांनी २०२३ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले होते. (good)त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव क्लिन कारा कोनिडेला असून, हे नाव ‘ललिता सहस्त्रनाम’ या धार्मिक ग्रंथातून प्रेरित आहे, ज्याचा अर्थ ‘आध्यात्मिक जागृती आणणारी शुद्ध करणारी ऊर्जा’ असा होतो.

नुकताच राम चरण ‘गेम चेंजर’ चित्रपटात दिसला होता. (good)आगामी ‘पेड्डी’ या चित्रपटातही त्याची भूमिका पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर या घोषणा नंतर चाहत्यांकडून आणि मित्रांपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राम चरण आणि उपासनाला त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनासाठी भरपूर प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत.
हेही वाचा :
आता तुमच्या मुलाचंही पीएफ खातं उघडता येणार; जाणून घ्या योजना…
ऐन दिवाळीत आगीत होरपळली ‘ही’ अभिनेत्री, वडिलांनी वाचवले प्राण…
तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्…, VIDEO तुफान व्हायरलEdit