साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला(political) डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या मृत डॉक्टर तरुणीच्या तळहातावर तिच्या आत्महत्येमागील कारण लिहून ठेवलेलं आढळलं होत. याप्रकरण फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका वादामध्ये अडकली होती. या तपासणीसंदर्भात त्यांची अंतर्गत चौकशी सुरू होती. या चौकशीमुळे संबंधित महिला डॉक्टर तणावाखाली होती. यातूनच तिने टोकाचं पाऊल उचललं असावं, असं पोलिसांनी सांगितलं.

संबंधित मृत डॉक्टरने यापूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन, असा स्पष्ट इशारा दिला होता, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. (political) मृत डॉक्टरच्या तळहातावर तिच्या आत्महत्येमागील कारण लिहून ठेवलेलं आढळलं आहे. फलटण इथल्या एका पोलीस उपनिरीक्षकासह आणखी एका व्यक्तीला या आत्महत्येस जबाबदार धरण्यात आलं आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने अत्याचार केल्याची, तसंच अन्य व्यक्तीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं तिने तळहातावर लिहून ठेवलं होतं.

संबंधित मृत डॉक्टर बीड जिल्ह्याची असून तिचे वडील तिथे शेती करतात. शेती करून त्यांनी मुलीचं शिक्षण पूर्ण केलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तरुणीने जळगावमधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं होतं. 2022 पासून त्या साताऱ्यातील फलटण इथं उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आत्महत्येच्या दोन दिवस आधीच त्यांचं वडिलांशी फोनवरून बोलणं झालं होतं. (political) आपण प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचं त्यांनी अनेकदा वरिष्ठांना आणि नातेवाईकांना सांगितलं होतं.

“तिच्या तक्रारीची दखल न घेणारे जो कोणी अधिकारी असतील, त्या सर्वांना आरोप केलं पाहिजे. (political) या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे. मग यात खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए असो. त्यांनाही या प्रकरणात आरोपी ठरवलं पाहिजे. डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिच्या कुटुंबीयांच्या बाजूने उभे राहू,” असं आमदार सुरेश धस म्हणाले. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा :

भाजपचा बडा नेता अचानक शरद पवारांच्या भेटीला, दिली मोठी गुड

खेळाडू जे पाणी पितात, त्याची किंमत इतकी? एका बॉटलची किंमत ऐकून

नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *