नोव्हेंबर महिन्यात कोणतेही मोठे सण नाहीत. तरीही या महिन्यात ९ ते १० दिवस बँका बंद राहणार आहेत.(November) ५ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती आहे. तर त्याच दिवशी कार्तिक पोर्णिमा आहे. या दिवशी देशातील बहुतेक बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात खातेदारकांना वेळेचं नियोजन करून बँकेतील कामे पूर्ण करावी लागतील.नोव्हेंबर महिन्यात इगास-बग्वालच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरु आणि देहरादूनमध्ये बँका बंद राहतील.नोव्हेंबरमध्ये २ तारखेला रविवारी असल्याने संपूर्ण देशातील बँका बहंद राहतील.५ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती/कार्तिक पोर्णिमा/रहस पोर्णिमेच्या दिवशी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.७ नोव्हेंबर रोजी वंगाला महोत्सवानिमित्त शिलाँगमधील बँका बंद राहतील.८ नोव्हेंबर रोजी दुसरा शनिवार असल्याने संपूर्ण देशात बँका बंद राहतील. तसेच कनकदास जयंतीनिमित्त बेंगळुरमध्ये बँका बंद राहतील.

९ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने (November) संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
१६ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने संपूर्ण देशात बंद राहतील.
२२ नोव्हेंबर रोजी चौथा शनिवारी असल्याने संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
२३ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद राहतील.
३० नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद राहतील .

बँकांच्या सुट्ट्यांच्या दिवशी चेक क्लिअर करणे,(November) पासबुक अपटेड किंवा पैसे काढण्याची सोय उपलब्ध होणार नाही. मात्र, डिजिटल बँकिंग चॅनल- मोबाइल अॅप, नेट बँकिंग आणि एटीएम सारख्या सुविधा सुरु राहतील. कर्ज परतफेड, रिकरिंग डिपॉजिट कपात किंवा गुंतवणुकीची परिपक्वता या सारख्या गोष्टी सुट्टीच्या दिवशी येत असल्यास आरबीआयच्या मार्गदर्शकाच्या तत्वानुसार या प्रक्रिया सहसा पुढील कामकाजाच्या दिवशी केली जाईल. शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्याठी ग्राहकांनी सुट्टीच्या आदल्या दिवशी बँकामधील कामे पूर्ण करावी. तुम्हाला पैसे हवे असल्यास ऑनलाइन बँकिग आणि एटीएमच्या सुविधाचा वापर करता येईल.
हेही वाचा :
विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर!
मासिक पाळीदरम्यान त्रास होतोय? हे घरगुती आयुर्वेदिक उपाय नक्की ट्राय
AI या 10 नोकऱ्या खाऊन टाकणार? कोणाला सर्वाधिक धोका, नावच वाचा