फलटण येथील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी रोज नवीन माहिती पोलिसांना मिळत आहे. मुळ बीडच्या रहीवासी असणाऱ्या तरुणीने फलटणच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या (suicide)केली. या प्रकरणात मुख्य आरोपी पकडल्या गेल्यानंतर आता या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीडित डॉक्टर तरूणीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीनंतर आमदार धस यांनी या प्रकरणी मोठी मागणी केली आहे.मृत डॉक्टर तरुणीने अनेक वेळा तक्रार अर्ज दिले होते, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

आमदार धस यांनी सांगितलं की, ते या प्रकरणासंदर्भात सोमवार, दि. २७ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर सातारा पोलिसांनी पीडित कुटुंबाचा बीडमध्ये येऊन जबाब घ्यावा, जबाब घेण्यासाठी त्यांना साताऱ्याला बोलवू नका, अशी मागणीही त्यांनी केली आहे(suicide). दरम्यान भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं देखील समोर आलं आहे.आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणी बोलताना म्हटलं की, “हॉस्पिटलमध्ये अनफिट असताना फिट असल्याचा सर्टिफिकेट देण्याचा दबाव पोलिसांकडून त्यांच्यावरती करण्यात आलेला होता, जर माझं काही बरं वाईट झालं, तर पोलीसच त्याला जबाबदार राहतील, असं स्टेटमेंट त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार त्या पोलिसाला निलंबित केलं आहे. दोन्ही आरोपींना अटक केल्याचं समोर आलंय.
पहाटे पाच वाजता मी ती न्यूज पाहिली. रात्री उशिरा आरोपी सरेंडर झाला आहे. त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्याच खुर्चीवर बसून डॉक्टरांना धमक्या देणे आणि अनफिट असताना फिटचं सर्टिफिकेट द्यायला लावणे, अशी कृत्ये तिथे सुरू होती.”त्याचबरोबर “ज्यावेळी त्या हॉटेलमध्ये डॉक्टर तरूणीने गळफास घेतला त्या वेळचे पोलिसांनी फोटो व्हिडिओ काढले होते ते त्यांच्या परिवाराला देण्यात आलेले किंवा दाखवण्यात आलेले नाहीत.

सुसाईड झाल्यानंतर कुटुंबियांना कळवल्यानंतर गळफास घेतलेली मुलगी कोणत्या अधिकाराखाली खाली उतरवली, कुटुंबाला पोस्टमार्टम करण्यासाठी नेल्यावर दाखवलं जातं, हे सगळं संशयस्पद आहे आणि जर ती एवढी निर्भीड होती यंत्रनेशी लढत होती तर अशी मुलगी मुळात सुसाईड करेल का?, हा प्रश्न देखील उपस्थित होतो म्हणून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, मुख्यमंत्री संवेदनशील आहेत ते शंभर टक्के न्याय देतील” असेही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
‘माझ्या शर्टमध्ये हात घातला, मला किस केलं’; अभिनेत्रीने सांगितला….
जगातील करमुक्त देश कोणते? लगेच जाणून घ्या
कोल्हापूर :जन्मदात्या बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चाकूचा धाक दाखवत भयंकर कृत्य; कोल्हापूर हादरले