हार्टच्या आरोग्याबाबत अनेकांच्या मनात एक गैरसमज आहे की, (acidity)शरीरात काही बिघाड झाला तर ते ताबडतोब संकेत देईल. पण तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येकवेळी असे स्पष्ट संकेत मिळत नाहीत. काहीवेळा हार्टशी संबंधित समस्या छातीत वेदना न होता इतर भागांमध्ये दिसू शकतात, त्यामुळे अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात.वय ५० पेक्षा जास्त, जास्त वजन, कोलेस्ट्रॉल वाढलेला किंवा रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका जास्त असतो. डॉक्टर सांगतात की, काही साधे लक्षणे वेळेत ओळखली तर मोठा धोका टाळता येतो.

पहिलं आणि सगळ्यात सामान्य लक्षण म्हणजे छातीत वेदना होणे किंवा ताण जाणवणे. जर रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक झाल्या असतील, तर छातीत दाब, जळजळ, कडकपणा किंवा ताण जाणवतो. (acidity)ही भावना काही मिनिटे टिकते आणि कधी विश्रांतीत, तर कधी शारीरिक क्रियेमध्येही दिसते. परंतु वेदना क्षणिक असेल आणि दाबल्यावर वाढत असेल तर ती स्नायूंच्या वेदनांमुळे असण्याची शक्यता असते.काही लोकांना मळमळ, जळजळ किंवा उलट्या होतात. विशेषतः महिलांमध्ये हे लक्षण जास्त दिसते. दुसरं सामान्य लक्षण म्हणजे डाव्या हाताकडे पसरत जाणारी वेदना. ही वेदना छातीपासून हातापर्यंत जाते आणि हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो.

तिसरं लक्षण म्हणजे चक्कर येणे. (acidity)शरीरात पाणी कमी झाल्याने, उपाशी राहणं किंवा अचानक उठल्यानेही असं होऊ शकतं. मात्र जर छातीत वेदना आणि श्वास घेण्यास त्रास यासोबत जाणवत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. कधी कधी घशात वेदना जाणवतात.जर ही वेदना छातीतील ताणासोबत असेल आणि वरच्या दिशेने पसरत असेल, तर ती हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. अशा वेळी स्ट्रेस टेस्ट किंवा इतर वैद्यकीय तपासणीद्वारे हृदयातील ब्लॉकेज आहे का हे समजून घेता येतं.
हेही वाचा :
भाजपचा बडा नेता अचानक शरद पवारांच्या भेटीला, दिली मोठी गुड
खेळाडू जे पाणी पितात, त्याची किंमत इतकी? एका बॉटलची किंमत ऐकून
नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण