यंदा पाऊस काही पाठ सोडायला तयार नाहीये, काही दिवसांपूर्वीच (country)देशासह महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती, याचा मोठा फटका हा अनेक राज्यांना बसला, महाराष्ट्रातही प्रचंड नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळ, तामिळूनाडूसह संपूर्ण दक्षिण भारतामध्ये पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीव अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.दरम्यान याचा परिणाम हा महाराष्ट्रातही जाणवणार आहे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे अरबी समुद्रात वादळसदृश वातावरण निर्माण झालं आहे, तसेच ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहत आहेत. मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये, (country)असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नौका आश्रयासाठी बंदरात दाखल झाल्या आहेत. दोन दिवस वादळसदृश वातावरण असल्याने मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या असून, यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला येथील नौकांचा देखील समावेश आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात वादळ सदृश्य परिस्थिती कायम राहणार आहे.

काल सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. नागरी वस्तीतही काही प्रमाणात पाणी साचले होते.(country) मात्र मध्यरात्री पावसाने उसंत दिल्याने सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सोलापूर शहरातील पूर्व भाग, अवंती नगर, वसंत विहार, जुळे सोलापूर, नई जिंदगी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, पाणी साचल्याचं पहायला मिळालं.
हेही वाचा :
भाजपचा बडा नेता अचानक शरद पवारांच्या भेटीला, दिली मोठी गुड
खेळाडू जे पाणी पितात, त्याची किंमत इतकी? एका बॉटलची किंमत ऐकून
नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण