सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते अभिनेत्री(actress) असा प्रवास करणाऱ्या डॉली सिंहने तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउचच्या धक्कादायक अनुभवाविषयी खुलासा केला आहे. मनोरंजन विश्वात पदार्पण करत असतानाच तिला एका कास्टिंगडायरेक्टरकडून अत्यंत वाईट वागणूक मिळाली होती. तिच्या या अनुभवाने इंडस्ट्रीतील कटू वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.डॉली सिंह आज एक यशस्वी अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखली जाते. मात्र, तिच्या करिअरची सुरुवात संघर्षाची होती. एका मुलाखतीत तिने सांगितले की, वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. ही घटना दिल्लीत घडली, जेव्हा ती अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होती.

त्यावेळी ती एका कास्टिंग डायरेक्टरच्या संपर्कात आली. सुरुवातीला फोनवर बोलतानाच तिला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली होती. तिच्या मनात शंका होती की हा कॉल तिच्या टॅलेंटसाठी आहे की त्यामागे काही वेगळाच हेतू आहे. तरीही, तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्या कास्टिंग डायरेक्टरने(actress) तिला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका निर्मात्याला भेटण्यासाठी बोलावले.निर्मात्यासोबतची बैठक संपल्यानंतर खरा धक्कादायक प्रकार घडला. डॉली जेव्हा त्या कास्टिंग डायरेक्टरसोबत गाडीत बसली, तेव्हा त्याने अचानक तिचे चुंबन घेतले आणि तिच्या शर्टमध्ये हात घातला. या अनपेक्षित आणि घृणास्पद कृत्याने डॉली प्रचंड घाबरली. त्यावेळी तिचे वय फक्त १९ वर्षे होते, तर तो दिग्दर्शक जवळपास ३५-४० वर्षांचा होता.

काय करावे हे न सुचल्याने डॉलीने (actress)त्या व्यक्तीला स्वतःपासून दूर ढकलले आणि तिला जवळच्या मेट्रो स्टेशनवर सोडण्याची विनंती केली. सुदैवाने ती त्या दिवशी तिथून निसटली. मात्र, इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक धक्कादायक घटना घडतात आणि अनेक नवोदितांना याचा सामना करावा लागतो, असेही तिने या मुलाखतीत नमूद केले.

हेही वाचा :
भाजपचा बडा नेता अचानक शरद पवारांच्या भेटीला, दिली मोठी गुड
खेळाडू जे पाणी पितात, त्याची किंमत इतकी? एका बॉटलची किंमत ऐकून
नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण