कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक(biological) घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील एका गावामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात नराधाम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील एका गावामध्ये ही भयंकर घटना घडली. बापाने १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. गणेशोत्सवादरम्यान ही घटना घडली होती. पण दोन दिवसांपूर्वी बापाने पु्न्हा मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या आईने ते पाहिलं त्यानंतर तिने बापाच्या तावडीतून मुलीची सुटका केली आणि थेट पोलिस ठाणे गाठले.

आरोपीने चाकूचा धाक दाखवत हे भयंकर कृत्य केले. पीडित मुलीच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल केला. (biological) पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. आरोपी बापाला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिला संघटनांसह सामाजिक संस्थांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (biological) आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि दोन लहान मुलं कोल्हापूरात राहत होती. पीडित मुलीची आई भंगार गोळा करून घर सांभाळते. दिवाळी तोंडावर असल्याचे कारण देत आरोपी मुलीला गावी घेऊ गेला. तेव्हा त्याने तिला चाकूचा धाक दाखवून मुलीवर बलात्कार केला. तसंच कुणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकेल अशी देखील धमकी देण्यात आली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने कुणालाच हे सांगितले नाही. शेवटी तिच्या आईने बापाला तिच्यावर अत्याचार करताना पाहिले तेव्हा ही घटना समोर आली.
हेही वाचा :
भाजपचा बडा नेता अचानक शरद पवारांच्या भेटीला, दिली मोठी गुड
खेळाडू जे पाणी पितात, त्याची किंमत इतकी? एका बॉटलची किंमत ऐकून
नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण