इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज(College) मध्ये एस. आर. रंगनाथन जयंती अर्थात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांमधील ‘बेस्ट रीडर’ या पारितोषकाचे वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मागील शैक्षणिक वर्षातील कु. सानिका भामणे (विद्यार्थी), प्रा. डी जे मुंगारे (प्राध्यापक), श्री. जयकुमार करके (शिक्षकेतर कर्मचारी) या उत्कृष्ट वाचकांना ‘बेस्ट रीडर’ या पारितोषिकाने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले, ” वाचनाने माणूस समृद्ध होतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि ए. आय. च्या काळात माणूस अधिकाधिक आळशी होईल अशी भीती आहे. आपण ग्रंथालयात रमायला हवे. पुस्तकांशी नाते निर्माण करायला हवे तरच जगणे आनंदी आणि समृद्ध होईल.”

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एस. के. खाडे म्हणाले, ” विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाबरोबर अवांतर वाचन करून स्वतःला उत्तम रसिक बनवले पाहिजे(College). साहित्यकृती, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके ही ग्रंथालयात विद्यार्थ्यांनी अधिकाधिक समृद्ध व्हावे यासाठी असतात. आपल्या सर्वांगीण विकासासाठी वाचन हाच राजमार्ग आहे.”
यावेळी प्रा. डी. ए. यादव, प्रा. व्ही. पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत ग्रंथपाल सौ. स्वाती देसाई यांनी केली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रोहित शिंगे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कु. संजीवनी कदम हिने मानले. यावेळी प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा :
तरुणांनो तयारीला लागा! राज्यात १५ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार
सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात; बसची गाडीला जोरदार धडक…
उरले फक्त काही तास बँकांची काम करून घ्या नाही तर…