इचलकरंजी : दत्तनगर भाटले मळा परिसरातील कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट, पाण्याची गळती आणि रस्त्यांवरील खड्डे अशा गंभीर समस्यांचे(problems) निराकरण करण्यासाठी इचलकरंजी नागरिक मंचतर्फे महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले.

निवेदनात परिसरातील कचरा वेळेवर न उचलणे, घंटागाडी प्रत्येक घरापर्यंत न जाणे, अनेक स्ट्रीट लाईट बंद पडणे, पाण्याच्या पाईपलाईनमधील गळती, तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यांवर तातडीने पॅचवर्क करण्याची गरज यावर भर देण्यात आला(problems). तसेच अतुल भाटले यांच्या घराजवळील चौकात नवीन स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणीही करण्यात आली.
प्रभारी सहा. उपायुक्त विजय राजापूरे यांना हे निवेदन देण्यात आले असून त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उमेश पाटील व सचिन कांबळे यांनी समस्यांची सविस्तर मांडणी केली.
निवेदन देताना राजु कोन्नूर, राजू पारीक, विद्यासागर चराटे, शितल लिगाडे, जतीन पोतदार, हरीश देवाडिगा, महेंद्र जाधव, राम आडकी, बालाजी शिंदे, अतुल भाटले, व्यंकटेश साका, प्रसाद हळदे, महेश कदम, प्रसाद जासूद, कपिल ढवळे, मोहन कुंभार, डॉ. सुप्रिया माने, कल्पना माळी, उदयसिंह निंबाळकर, शितल मगदूम, नितीन ठिगळे, अमोल मोरे, सचिन वाली, संजय डाके यांच्यासह इनाम सदस्य व दत्तनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.
निवेदन देताना उमेश पाटील,सचिन कांबळे व इतर
हेही वाचा :
तरुणांनो तयारीला लागा! राज्यात १५ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार
सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात; बसची गाडीला जोरदार धडक…
उरले फक्त काही तास बँकांची काम करून घ्या नाही तर…