‘बिग बॉस 18’मुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेली आणि आपल्या सौंदर्यानं नव्वदचं दशक गाजवलेली अभिनेत्री म्हणजे, शिल्पा शिरोडकर मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शिरोडकरच्या गाडीला भीषण अपघात(accident) झालाय. शिल्पानं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली. एका बसनं शिल्पाच्या गाडीला धडक दिली असून तिच्या गाडीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यासंदर्भात शिल्पानं फोटोंसह एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तसेच, शिल्पानं याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

शिल्पानं बस आणि तिच्या कारचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबतच तिनं लिहिलंय की, “आज एका सिटी फ्लो बसने माझ्या कारला धडक दिली. सिटी फ्लो कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये संपर्क केला असता योगेश कदम आणि विलास मकोते यांनी जबाबदारी झटकली. ते घडलं ती ड्रायव्हरचीच जबाबदारी होती असं ते म्हणाले(accident). किती निर्दयी लोक आहेत. ड्रायव्हर असा किती कमवत असेल?” “मुंबई पोलिसांचे आभार. कोणतीही अडचण न येता त्यांनी मला तक्रार देण्यासाठी मदत केली.

पण बस कंपनीने मात्र जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी सिटी फ्लो कंपनीने मला संपर्क केला तर बरं होईल. सुदैवाने माझ्यासोबतचा स्टाफ सुरक्षित आहे त्यांना काहीही झालेलं नाही. मात्र काहीही घडू शकलं असतं.”, असं शिल्पा शिरोडकरनं पोस्टमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, शिल्पा शिरोडकरनं नव्वदचं दशक गाजवलेलं. शिल्पानं अनेक टॉप बॉलिवूड स्टार्ससोबत स्क्रिन शेअर केलेली. पण, त्यानंतर मात्र शिल्पा रुपेरी पडद्यापासून दूर गेली.

त्यानंतर मात्र शिल्पा शिरोडकर कित्येक वर्षांनी स्क्रिनवर परतली ती, ‘बिग बॉस 18’मधून. शिल्पानं बिग बॉसच्या घरातल्या आपल्या वागणुकीनंसर्वांना प्रभावित केलेलं. अशातच आता शिल्पा शिरोडकर ओटीटीवर पदार्पण करणार असून ‘शंकर-रिव्होल्युशनरी मॅन’ या आदि शं‍कराचार्यांच्या बायोपिकमध्ये शिल्पा शिरोडकर दिसणार आहे.

हेही वाचा :

हा कसला स्वातंत्र्यदिन साजरा? हवाई गोळीबारात कहर, 3 जणांचा मृत्यू

उरले फक्त काही तास बँकांची काम करून घ्या नाही तर…

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *