उद्या, शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद राहणार आहेत. 15 ऑगस्टला देशभरात 78वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार असून, या निमित्ताने बँकांना सार्वजनिक सुट्टी जाहीर आहे. त्यामुळे तुम्हाला जर बँकेमध्ये काही महत्त्वाचे काम असेल तर तुम्हाला काहीच तास (hours)आहेत.

आताच नियोजन करून काम करून घ्या जेणेकरून तुमचा खोळंबा होणार नाही. 15 ऑगस्ट 2025 रोजी बँक शाखा बंद राहतील, मात्र ग्राहकांना एटीएम, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि यूपीआयसारख्या डिजिटल सुविधा नेहमीप्रमाणे उपलब्ध राहतील. ही सुट्टी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचित सुट्ट्यांच्या यादीत असून, ती सर्व सरकारी व खासगी बँकांवर लागू होईल.

सुट्टीच्या दिवशी नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय व एटीएमद्वारे व्यवहार करता येतील. मात्र चेक क्लिअरिंग, डिमांड ड्राफ्टसारख्या काही सेवा उपलब्ध राहणार नाहीत(hours). त्यामुळे बँकेचे महत्त्वाचे काम असल्यास ते सुट्टीपूर्वी किंवा नंतर करण्याची शिफारस केली जाते.
15 ऑगस्ट (शुक्रवार) – स्वातंत्र्यदिन / पारशी नववर्ष / जन्माष्टमी – देशभरात सुट्टी.
16 ऑगस्ट (शनिवार) – जन्माष्टमी (श्रावण वद-८) / कृष्ण जयंती – चेन्नई, हैदराबाद, रांची, जम्मू आदी शहरांमध्ये सुट्टी.
19 ऑगस्ट (मंगळवार) – महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर जयंती – फक्त अगरतला येथे सुट्टी.
25 ऑगस्ट (सोमवार) – श्रीमंत शंकरदेव तिरुभव तिथि – फक्त गुवाहाटी येथे सुट्टी.
27 ऑगस्ट (बुधवार) – गणेश चतुर्थी / संवत्सरी / गणेश पूजा – मुंबई, नागपूर, चेन्नई, हैदराबाद आदी शहरांमध्ये सुट्टी.
28 ऑगस्ट (गुरुवार) – गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) / नुआखाई – भुवनेश्वर व पणजी येथे सुट्टी.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….
हा कसला स्वातंत्र्यदिन साजरा? हवाई गोळीबारात कहर, 3 जणांचा मृत्यू
खाद्य संस्कृती आणि स्वातंत्र्य दिन