भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात धमाकेदार विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड केला. २३७ धावांचे लक्ष्य भारताने केवळ ३८.३ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयात कर्णधार रोहित शर्माने नाबाद १२१ धावांची जबरदस्त खेळी केली, तर विराट कोहलीने नाबाद ७४ धावा करत टीमला स्थिरता दिली(award). या दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या परिपूर्ण भागीदारीने प्रेक्षकांना आनंदित केले असून, भारतीय संघाच्या आगामी मोहिमांसाठी मोठा आत्मविश्वास दिला आहे.

रोहित शर्माने या मालिकेत १०१ च्या सरासरीने सर्वाधिक २०२ धावा करून “मालिकावीर” पुरस्कार पटकावला. सामन्यानंतर रोहित म्हणाला, “ऑस्ट्रेलियात खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. इथे दर्जेदार गोलंदाजांचा सामना करताना संयम आणि नियोजन आवश्यक असतं. आमचं संघटन तरुण आहे, पण या मालिकेतून सगळ्यांनी मौल्यवान अनुभव घेतले आहेत. आता आम्ही वरिष्ठ म्हणून नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.”
बीसीसीआयच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहितला “IMPACT PLAYER OF THE SERIES” पुरस्कारानेही (award)गौरविण्यात आले. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित-विराट जोडीचे विशेष कौतुक करताना म्हटलं, “ही भागीदारी अप्रतिम होती — परिपूर्ण, संयमी आणि टीमसाठी अत्यंत महत्त्वाची. रोहितने पुन्हा एकदा शतक झळकावत सामना संपवला, तर विराटनेही तेवढंच अप्रतिम साथ दिली.”

भारत आता पुढील काळात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध तीन-तीन वन डे सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ३० नोव्हेंबरपासून रांची येथे सुरू होईल, त्यानंतर रायपूर (३ डिसेंबर) आणि विशाखापट्टणम (६ डिसेंबर) येथे सामने होतील. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा निळ्या जर्सीत झळकणार आहेत, आणि चाहत्यांना त्यांच्या दमदार कामगिरीची पुन्हा उत्सुकता आहे.
हेही वाचा :
सर्व बँक खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी….
कचरागाडी आणि कारच्या मध्ये जाऊन चिरडले गेले दोन मजूर; Video Viral..
10,000 रुपयात Suzuki Access घरी न्या, ऑफर जाणून घ्या…