मध्यप्रेदशातील देवासमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारी आणि भारताचे नाव उज्ज्वल करणारी जुजित्सु खेळाडू(player) रोहिणी कलामने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. राधागंजमधील अर्जुन नगरमधील राहत्या घरात रोहिणीने आपलं जीवन संपवलं. आष्टा येथील एका खाजगी शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करणारी रोहिणी रविवारी सकाळी 10 वाजता तिच्या वडिलांसोबत आणि बहिणींसोबत चहा-नाश्ता केल्यानंतर तिच्या खोलीत गेली आणि पंख्याला दोरी बांधून तिने गळफास घेतला.

आष्टा येथील एका खाजगी शाळेत जुजित्सु खेळाडू रोहिणी कलाम ही स्पोर्ट्स कोच म्हणून काम करत होती. 32 वर्षांच्या रोहिणीने रविवारी अर्जुन नगर, राधागंज येथील घरी आत्महत्या केली. रिपोर्टनुसार सकाळी १० वाजता रोहिणीने तिचे वडील आणि बहिणींसोबत चहा आणि नाश्ता केला. त्यानंतर, फोनवर बोलत असताना, ती तिच्या खोलीत गेली आणि पंख्याला बांधलेल्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची बहीण रोशनी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रोहिणीचे वडील महेश कलमने सांगितलं की रोहिणी ज्या शाळेत कोच म्हणून कामाला होती तेथील त्रासाला ती कंटाळली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्जरीमुळे सुद्धा ती स्ट्रेसमध्ये होती. रोहिणीने 2007 मध्ये आपलं एथलेटिक करिअर सुरु केलं होतं. 18 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं भाग घेतला होता. तिने आठ पदके जिंकली, ज्यात चार रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी, अबू धाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जुजित्सू स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले. ती जुजित्सू फेडरेशनची सरचिटणीस देखील होती.

कुटुंबाच्या सांगण्यानुसार रोहिणीची आई आणि भाऊ हे खाटू श्यामच्या दर्शनासाठी गेले होते आणि रविवारी संध्याकाळी परतणार होते. घटनेच्या एक दिवस आधी सकाळी तिने आपल्या आईशी फोनवर बातचीत केली होती. जेव्हा रोहिणीचे कोच विजेंद्रने फोन केला तेव्हा कुटुंबाला शंका आली. मात्र तो पर्यंत रोहिणीने टोकाचं(player) पाऊल उचललं होतं. रोहिणीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे आणि तिची खोली सील करण्यात आली आहे. या घटनेने क्रीडा जगत आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा :
मला जाऊ द्या ना घरी..अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीवर डान्स…
चारवेळा बलात्कार केल्याचं दोघांच्या लोकेशनवरुन…’; फोन रेकॉर्डसंदर्भात मोठा खुलासा
८ दिवसात लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होणार….