आज मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025. वैदिक पंचांगानुसार आजचा दिवस अत्यंत शुभ(special) आणि विशेष मानला जात आहे. ग्रह-नक्षत्रांच्या दुर्लभ संयोगामुळे सर्व १२ राशींवर सकारात्मक आणि काही ठिकाणी आव्हानात्मक परिणाम दिसून येतील. भगवान गणेशाची कृपा सर्वांवर राहो, चला जाणून घेऊया आजचे १२ राशींचे भविष्य

मेष
आज टेलरिंग किंवा कापड व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी शुभ दिवस आहे. कलेशी संबंधित कार्यात नवीन संधी मिळतील. प्रयत्नांना योग्य यश मिळेल.
वृषभ
आज तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात रुबाब दिसेल. स्वतःच्या मानमर्यादा टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. संयम राखा, लाभ तुमचाच होईल.
मिथुन
धाडस आणि साहस हातात हात घालून येतील. कामाचा वेग वाढेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे.
कर्क
मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाच्याही भावनांना दुखावू नका. घरात सौहार्द टिकवण्यासाठी संयम आवश्यक आहे.
सिंह
आज थोडी चिडचिड जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक वाद टाळा आणि शांततेने निर्णय घ्या.
कन्या
वाहन चालवताना खबरदारी घ्या. आईशी मतभेद होऊ शकतात. महिला वर्गाने आज थोडी बचत करावी.
तूळ
स्वतःच्या विचारांवर ठाम राहाल पण थोडा भ्रम संभवतो. निर्णय घेण्याआधी सल्ला घ्या.
वृश्चिक
तुमच्या हट्ट आणि दृढनिश्चयामुळे यश मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा — विजय नक्की तुमचाच आहे.
धनु
आज पारंपरिक विचार बदलून आधुनिकतेकडे वळाल. नवीन संकल्पना आणि कल्पनांना प्राधान्य द्याल.
मकर
कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. संयम आणि सातत्य ठेवा. प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत.
कुंभ
कामांची गती मंद राहील, पण चिकाटी ठेवा. प्रयत्नशील राहिलात तर यश लांब नाही.

मीन
विचार आणि विवेकी वृत्तीमुळे आजूबाजूचे लोक तुमचे कौतुक करतील. कामात प्रगती आणि सन्मान लाभेल.
हेही वाचा :
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…कार्तिकी एकादशीनिमित्त गाव ते पंढरपूर थेट सेवा
पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; ५ वर्षात मिळवा ५ लाखांचे व्याज..
टीम इंडियाला मोठा धक्का…