भारतीय महिला क्रिकेट संघाला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली सलामीवीर प्रतीका रावल दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाली(Team India) आहे. रविवारी, २६ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना तिच्या गुडघ्याला आणि घोट्याला दुखापत झाली. या घटनेनंतर तिला तातडीने मैदानाबाहेर नेण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीनंतर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला.प्रतीका रावलने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात १२२ धावांची शानदार खेळी करत भारताला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तिच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाच्या सलामी जोडीसमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

३० ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य सामना रंगणार आहे. साखळी फेरीत भारत चौथ्या क्रमांकावर होता, तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर राहिला होता. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला या लढतीत सर्वोत्तम खेळ करावा लागेल(Team India).आता सर्वांच्या नजरा या प्रश्नाकडे वळल्या आहेत की स्मृती मानधनासोबत सलामीला कोण उतरणार? संघ व्यवस्थापनाकडे हरलीन देओल, अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा हे तीन प्रमुख पर्याय आहेत. बांगलादेशविरुद्ध अमनजोतने सलामी दिली असली तरी हरलीन देओलला अनुभव आणि स्थिरतेमुळे अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. माजी कर्णधार मिताली राजनेही हरलीनला सलामीला पाठवणे योग्य ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.

दीप्ती शर्मा हिचाही पर्याय विचाराधीन आहे, कारण तिने पूर्वी एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीची जबाबदारी सांभाळली आहे आणि तिच्या नावावर १८८ धावांची सर्वोच्च खेळी आहे.प्रतीका रावलच्या अनुपस्थितीने भारतीय संघाच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो, परंतु संघ व्यवस्थापनाला तिच्या जागी योग्य पर्याय शोधावा लागणार आहे. भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा आता स्मृती आणि हरमनप्रीतवर आहेत, की त्या या महत्त्वाच्या सामन्यात भारताला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जातील.
हेही वाचा :
कुटुंबासोबत चहा घेतला, दार बंद केलं अन् काही वेळात…. भारताच्या स्टार खेळाडूने उचललं टोकाचं पाऊल
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी!
मला जाऊ द्या ना घरी..अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीवर डान्स…