सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे. ज्यांना दरमहा थोडी रक्कम गुंतवून मोठी रक्कम उभारायची आहे, त्यांच्यासाठी पोस्टाची आवर्ती ठेव योजना फायदेशीर ठरू शकते. म्युच्युअल फंडाच्या एसआयपीप्रमाणे यात दरमहा गुंतवणूक करता येते, पण ही गुंतवणूक पूर्णपणे जोखिमुक्त असते.पोस्ट ऑफिसची आरडी योजना ही पूर्णपणे सुरक्षित मानली जाते कारण तिला सरकारची हमी असते, त्यामुळे गुंतवलेला पैसा बुडण्याची भीती नसते. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. दरमहा किमान १०० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करता येते, तर कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. यामुळे गुंतवणूकदार आपल्या क्षमतेनुसार रक्कम गुंतवू(interest) शकतो.

या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असतो. विशेष म्हणजे, खाते उघडल्यानंतर एक वर्षाने, जमा रकमेच्या ५०% पर्यंत रक्कम कर्ज म्हणून घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. अचानक पैशांची गरज भासल्यास खाते बंद न करता कर्ज घेता येत असल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळतो.अनेकांना प्रश्न पडतो की यातून चांगला परतावा कसा मिळतो? पोस्ट ऑफिस आरडी योजनेत आकर्षक व्याजदर(interest) दिला जातो. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा ५०,००० रुपयांची गुंतवणूक या योजनेत ५ वर्षांसाठी केली, तर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला एकूण अंदाजे ३५ लाख रुपये मिळू शकतात.

या ३५ लाखांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक ३० लाख रुपये असेल आणि उर्वरित ५ लाख रुपये तुम्हाला व्याज म्हणून मिळतील. यासोबतच, या योजनेत प्राप्तिकर कायद्यानुसार १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभही मिळू शकतो. त्यामुळे सुरक्षित परतावा आणि कर बचत मिळवण्यासाठी ही योजना उत्तम आहे.
हेही वाचा :
कुटुंबासोबत चहा घेतला, दार बंद केलं अन् काही वेळात…. भारताच्या स्टार खेळाडूने उचललं टोकाचं पाऊल
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी!
मला जाऊ द्या ना घरी..अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीवर डान्स…