केंद्र सरकारच्या (government)कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील १ कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जानेवारी महिन्यात ८व्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली होती, मात्र नियम आणि अटी ठरविण्यास उशीर झाल्याने कर्मचारीवर्गात संभ्रम निर्माण झाला होता. अखेर आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आयोगाला औपचारिक मान्यता मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या अपेक्षांना नवा वेग मिळाला आहे. या आयोगाला गठनेच्या तारखेपासून १८ महिन्यांच्या आत आपल्या शिफारसी सरकारकडे सादर कराव्या लागतील.
केंद्रीय वेतन आयोगाचे मुख्य काम म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा पगार, भत्ते आणि सेवेच्या अटींचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा सुचवणे. साधारणतः प्रत्येक १० वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. वेतनवाढीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर, ज्याद्वारे जुन्या बेसिक पगाराला गुणून नवीन बेसिक पगार निश्चित केला जातो.
७व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर २.५७ इतका होता, ज्यामुळे किमान बेसिक पगार ६,००० रुपयांवरून थेट १८,००० रुपयांवर गेला होता. आता ८व्या वेतन आयोगात फिटमेंट(government) फॅक्टर २.४७ ठेवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार १८,००० रुपयांवरून जवळपास ४४,४६० रुपये होऊ शकतो. तर जर हा घटक १.८३ किंवा १.८६ ठेवण्यात आला, तर पगार अनुक्रमे ३२,९४० रुपये आणि ३३,४८० रुपये इतका होईल.

या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या शिफारसींकडे लागले आहे. ८वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केवळ पगारवाढच नव्हे, तर पेन्शनधारकांच्या लाभांमध्येही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
1 नोव्हेंबेरपासून बँक खातेदारांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत ‘हे’ 5 नियम बदलणार
‘घरात ठेवले आहेत बॉम्ब…’, साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि धनुषला जीवे मारण्याची धमकी
अंधाऱ्या राती रस्त्यावर दिसून आले भयानक दृश्य, शेकडो तडफडते मासे अन्… थरारक Video Viral