बॉलीवूड स्टार्स आणि युट्यूबर्सना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या यादीत सलमान खानपासून शाहरुख खानपर्यंतच्या(superstar) नावाचा समावेश आहे. परंतु , या धमक्या अनेकदा खोट्या ठरल्या आहेत. दरम्यान, दक्षिण भारतातील दोन प्रमुख स्टार्सना धमकीचे ईमेल आले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. आणि हे कलाकार दुसरे तिसरे कोण नसून साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि धनुष हे दोघे आहेत.

दक्षिण सुपरस्टार (superstar)रजनीकांत आणि धनुष यांना बॉम्बस्फोटाच्या धमक्याचे ईमेल मिळाले आले. पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले. हे ईमेल तामिळनाडूच्या पोलिस महासंचालकांच्या अधिकृत ईमेल पत्त्यावर पाठवण्यात आले. ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की दोन्ही अभिनेत्यांच्या चेन्नईतील घरांवर बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार, अधिकाऱ्यांनी ताबडतोब शोध मोहीम सुरू केली, परंतु पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर, धमक्या खोट्या असल्याचे आढळून आले.
एवढेच नाही तर या ईमेलमध्ये तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे प्रमुख के. सेल्वापेरुंथागाई यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. परिणामी, तिघांच्या घरांची झडती घेण्यात आली आणि धमक्या खोट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या चौकशीनंतर, पोलिसांनी जनतेला माहिती दिली की कोणतेही बॉम्ब किंवा तत्सम वस्तू सापडल्या नाहीत, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की तामिळनाडूमध्ये अशा घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही; याआधीही अशाच घटना घडल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, अभिनेत्री त्रिशा आणि इतर व्हीआयपींच्या मालमत्तेला लक्ष्य करून बॉम्बची बनावट धमकी पाठवण्यात आली होती. शिवाय, ९ ऑक्टोबर रोजी, अभिनेता विजयच्या नीलंकराई येथील घरी बॉम्बची बनावट धमकी पाठवल्याबद्दल शाबिक नावाच्या ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :
भारताचा ‘हा’ स्टार फलंदाज तीन सामन्यांमधून बाहेर…
डॉक्टर संपदा मुंडेचा हॉटेलमधील शेवटचा व्हिडीओ समोर…
अंगणवाड्यांमध्ये आता ‘स्मार्ट’ शिक्षण! ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी…