आरोग्यतज्ज्ञ सतत सांगत असतात की संतुलित आणि पौष्टिक आहार हा केवळ शरीराच्या नव्हे तर मेंदूच्या आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक जंक फूड, तळलेले पदार्थ आणि उच्च चरबीयुक्त अन्नाचे सेवन वाढवत आहेत, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूचे कार्य बिघडण्याची(negative) शक्यता वाढते. नुकत्याच जाहीर झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, उच्च चरबीयुक्त आहारामुळे मेंदूतील “ऑटोफॅगी” नावाची प्रक्रिया मंदावते, जी न्यूरॉन पेशींच्या स्वच्छतेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक असते.

हा अभ्यास जपानमधील चिबा विद्यापीठातील संशोधकांनी केला असून, तो PLOS Genetics या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी फळ माशी वर प्रयोग करून हे सिद्ध केले की उच्च चरबीयुक्त आहारामुळे त्यांच्या मध्यम कालावधीच्या स्मरणशक्तीवर वाईट(negative) परिणाम झाला, जरी अल्पकालीन स्मरणशक्तीवर त्याचा फारसा प्रभाव दिसला नाही.संशोधकांच्या मते, जेव्हा आहारातील चरबीचे प्रमाण खूप वाढते, तेव्हा मेंदूतील पेशींमध्ये जमा होणारा कचरा प्रभावीपणे साफ होत नाही आणि यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. परंतु चांगली बातमी म्हणजे, जर या “ऑटोफॅगी” प्रक्रियेला पुन्हा गती दिली गेली — जसे की व्यायाम, अधूनमधून उपवास किंवा निरोगी आहाराद्वारे — तर स्मरणशक्ती सुधारण्याची शक्यता वाढते.

संशोधकांनी असेही नमूद केले आहे की उच्च चरबीयुक्त आहारामुळे केवळ स्मरणशक्तीच नव्हे तर हृदयरोग, कर्करोग, आणि चयापचयाशी संबंधित आजारांचा धोका देखील वाढतो. त्यामुळे लोकांनी आहारात ताजे फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, आणि प्रथिने यांचा समावेश करावा.ही माहिती केवळ जनजागृतीसाठी दिली आहे. वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. आहार किंवा आरोग्याशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा :
25,000 पेक्षा कमी किमतीत Redmi Note फोन, Amazon वरील ऑफर जाणून घ्या
सोन्याचा रेट 1 लाखाच्या खाली येणार? सोनं 13,000 रुपयांनी स्वस्त झाले…
टाटा नेक्सॉन बनली देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार; जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स