ऊस (sugarcane)हा केवळ चवीला गोड नसून आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक मानला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत ऊसाला धार्मिक महत्त्व आहे. सण-उत्सवांमध्ये, विशेषतः प्रसादासाठी ऊसाचा वापर केला जातो. मात्र, या धार्मिकतेबरोबरच ऊस शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. तो त्वरित ऊर्जा देतो, पचन सुधारतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.ऊस आणि त्याचा रस हे दोन्ही ऊर्जा देणारे नैसर्गिक स्रोत आहेत. ऊस चावल्याने शरीराला ग्लुकोजचा पुरवठा हळूहळू होतो, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळते. तर दुसरीकडे, उसाचा रस पिल्यानंतर शरीरात लगेच ऊर्जा निर्माण होते आणि थकवा दूर होतो. म्हणूनच सकाळी किंवा व्यायामानंतर ऊस किंवा उसाचा रस घेणे विशेषतः उपयुक्त ठरते.

ऊस चावल्याने पोटातील फायबरचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात. तर उसाचा रस पचनासाठी चांगला असला तरी त्यात फायबर कमी असल्याने त्याचा परिणाम तुलनेने कमी असतो.ऊस आणि उसाचा (sugarcane)रस दोन्ही शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. उसातील अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे यकृत स्वच्छ ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीराची डिटॉक्स प्रक्रिया अधिक प्रभावी होते.

तसेच ऊस चावल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. त्यात असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असतात. नियमितपणे ऊस चावल्याने तोंडाच्या आरोग्याला देखील फायदा होतो.ऊसामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला संसर्गांपासून वाचवतात. त्यामुळे ऊस चावणे असो वा रस पिणे — दोन्ही आरोग्यासाठी लाभदायक आहेत. जर तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा आणि पचनाचा फायदा हवा असेल तर ऊस चावणे उत्तम पर्याय आहे. पण तात्काळ ऊर्जा, डिटॉक्स किंवा उन्हाळ्यातील थंडावा हवा असेल तर उसाचा रस पिणे अधिक फायदेशीर ठरेल.
हेही वाचा :
लोणचं ठरू शकतं ‘विष’; खाण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा
लवकरच आचारसंहिता लागणार; निवडणुकांची घोषणा होणार?
आजचा सोमवार ‘या’ राशींसाठी भाग्यशाली