इचलकरंजी : शहरातील एका परिसरात अंगणात खेळत असलेल्या (yard)अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे इचलकरंजीत खळबळ उडाली आहे. या अमानवी कृत्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने संधी साधत घरासमोर खेळत (yard)असलेल्या मुलीला गाठून हा प्रकार केला. मुलीने घरी घटनेची माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, लहान मुलांच्या (yard)सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी परिसरात पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.दरम्यान, पोलिस प्रशासनाने तपासाला गती दिली असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम
8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग