90च्या दशकातला तो काळ आठवतो का, जेव्हा सिनेमागृहात “तन्हा तन्हा यहाँ पे जीना…” वाजताच सगळे थांबायचे जायचे? आता तीच जादू परत रंगमंचावर येणार आहे! कारण, राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रंगीला’ हा कल्ट क्लासिक चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होतोय नव्या 4K HD री-स्टोर्ड व्हर्जनमध्ये! या पुनर्प्रदर्शनासह निर्मात्यांना आशा आहे की 1995 च्या त्या सोन्याच्या काळाची आठवण आजच्या पिढीलाही अनुभवता येईल. आणि जुन्या प्रेक्षकांसाठी तर ही आठवणींची सफरच ठरणार आहे.रंगीला म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर उर्मिला मातोंडकरचं ते बोल्ड आणि ग्लॅमरस रूप उभं राहतं. त्या काळात उर्मिलानं(actress) जॅकी श्रॉफच्या बनियानमध्ये दिलेला सीन इतका चर्चेत आला की तो आजही बॉलिवूडच्या बोल्ड मोमेंट्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. 1995 साली रिलीज झालेला हा चित्रपट उर्मिला आणि जॅकी श्रॉफ दोघांच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरला. उर्मिलाने त्या काळात 17 वर्षांनी मोठ्या जॅकीसोबत केलेल्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीनं प्रेक्षकांना वेडं केलं होतं.

राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं केवळ सिनेमाच नाही, तर त्या काळचा फॅशन ट्रेंडही पूर्ण बदलून टाकला. ‘रंगीला’नं 90च्या दशकात नव्या युगाची सुरुवात केली जिथं ग्लॅमर, संगीत आणि रिअॅलिझम एकत्र आले. फिल्मचं म्युझिक ए. आर. रहमान यांनी दिलं होतं, आणि “याई रे याई रे जोर लगाके नाचे रे”, “मंगता है क्या”, “तन्हा तन्हा” आणि “यारों सुन लो जरा” अशी गाणी आजही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहेत.या क्लासिक चित्रपटाला 30 वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 28 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित केलं जाणार आहे. अल्ट्रा मीडिया चे सीईओ सुशील कुमार अग्रवाल यांनी सांगितलं “रंगीला अनेकांसाठी बॉलिवूडच्या सोन्याच्या काळाची आठवण आहे. ‘अल्ट्रा रिवाइंड’च्या माध्यमातून आम्ही ही क्लासिक फिल्म आजच्या पिढीपर्यंत नव्या, शानदार 4K स्वरूपात पोहोचवत आहोत.”
‘रंगीला’ची कथा तीन पात्रांभोवती फिरते. मुन्ना (आमिर खान), जो मुंबईत ब्लॅक टिकीट विकतो, मिली (उर्मिला मातोंडकर), जी हिरोईन बनण्याचं स्वप्न पाहते, आणि राज कमल (जॅकी श्रॉफ), जो आधीच सुपरस्टार आहे. मुन्नाला मिलीचं बालपणापासून प्रेम असतं, पण मिलीचं स्वप्न फिल्मी दुनियेत चमकण्याचं. ह्या प्रेमत्रिकोणात भावना, संगीत आणि संघर्ष सगळं काही होतं.‘झी कॉमेडी शो’च्या एका एपिसोडमध्ये उर्मिलानं त्या चर्चेत असलेल्या सीनबद्दल खुलासा केला होता “‘तन्हा तन्हा’ गाण्यासाठी मी जॅकी श्रॉफची बनियान घातली होती(actress). त्या वेळेस ते मजेशीर पण थोडं धाडसीही होतं. मला सांगितलं गेलं की काहीतरी वेगळं करायचंय, आणि मग जॅकी म्हणाला ‘माझी गंजी घाल, भिडू!’ मी थोडी गोंधळले पण शेवटी गाणं हिट झालं आणि लोकांनी भरभरून प्रेम दिलं.”

राम गोपाल वर्मानं काही काळापूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की मूळ ड्रेस त्यांना पसंत नव्हता. त्यावर जॅकीनं स्वतःहून आपली गंजी उर्मिलाला दिली. “मी म्हणालो की या सीनसाठी काहीतरी हटके हवं. ते ऐकून जॅकीनं लगेच म्हटलं ‘अरे भिडू, माझं टी-शर्ट देतोस का घालायला!’ आणि त्यानं आपली गंजी काढून उर्मिलाला दिली. त्या लुकचा खरा डिझायनर जॅकीच होता.”‘रंगीला’ फक्त एक चित्रपट नव्हता ती भावना होती, जी प्रत्येक 90 च्या दशकातल्या प्रेक्षकानं अनुभवली. त्याच्या संवादांपासून ते गाण्यांपर्यंत, प्रत्येक फ्रेममध्ये त्या काळाचं सौंदर्य आणि भावनिक खोली दिसते. 30 वर्षांनंतरही जेव्हा “मंगता है क्या…” वाजतं, तेव्हा आजच्या पिढीलाही तोच जादुई स्पार्क जाणवतो.
हेही वाचा :
आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो..
25,000 पेक्षा कमी किमतीत Redmi Note फोन, Amazon वरील ऑफर जाणून घ्या
सोन्याचा रेट 1 लाखाच्या खाली येणार? सोनं 13,000 रुपयांनी स्वस्त झाले…