शेअर बाजारात काल ३० ऑक्टोबर रोजी घसरण झाली होती. त्यामुळे काही गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज देखील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना (stock market)सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज कोणत्याही शेअर्सची खेरदी आणि विक्री करताना सावध भुमिका बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. जागतिक बाजारातील संकेतांचा विचार करता आज तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज शुक्रवारी सावधगिरीने उघडण्याची शक्यता आहे.

गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सौम्य सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,०५८ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २६ अंकांनी जास्त होता. गुरुवारी, भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरणीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २५,९०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ५९२.६७ अंकांनी म्हणजेच ०.७०% ने घसरून ८४,४०४.४६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १७६.०५ अंकांनी म्हणजेच ०.६८% ने घसरून २५,८७७.८५ वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ३५४.१५ अंकांनी किंवा ०.६१% ने घसरून ५८,०३१.१० वर बंद झाला.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना (stock market)खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (हुडको) आणि एनबीसीसी (इंडिया) यांचा समावेश आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आरएचआय मॅग्नेसिटा, रेफेक्स इंडस्ट्रीज आणि एनएलसी इंडिया यांचा समावेश आहे.

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शिफारस केली आहे. ज्यामध्ये जेके टायर अँड इंडस्ट्रीज, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, बीएसएल, इंद्रप्रस्थ मेडिकल कॉर्पोरेशन आणि जीआरएम ओव्हरसीज यांचा समावेश आहे.सुमारे ७० कंपन्या आज, शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी त्यांचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करण्यास सज्ज आहेत. या आठवड्यात ३०० हून अधिक कंपन्या त्यांचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक वर्ष २६ चे उत्पन्न जाहीर करणार होत्या. मारुती सुझुकी, वेदांत, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन , गेल, श्रीराम फायनान्स, बँक ऑफ बडोदा यासारख्या कंपन्या आज त्यांच्या दुसऱ्या तिमाहीचे उत्पन्न जाहीर करणार आहेत .
हेही वाचा :
शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत बिघडली; लिलावती रुग्णालयाबाहेरचा अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल
‘शुटिंग करायचं सांगून खोलीत नेलं अन्..
फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच
