अनेकदा आपण घरात जास्त प्रमाणात जेवण बनवतो आणि उरलेले अन्न पुढील दिवशी वापरण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो. विशेषतः भाजी किंवा भात फ्रिजमध्ये(fridge) ठेवून दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याची सवय अनेक घरांमध्ये दिसून येते. मात्र तज्ज्ञांच्या मते असे अन्न पुन्हा गरम करून खाणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. विशेषतः भाताबाबत तर असे स्पष्ट सांगितले जाते की फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाल्ल्यास तो विषारी बनू शकतो.

भात शिजवल्यानंतर काही तासांनी त्यात बॅसिलस सेरियस नावाचे बॅक्टेरिया वाढू लागतात. हे बॅक्टेरिया पुन्हा गरम केल्याने नष्ट होतात, परंतु त्यांच्यामुळे तयार झालेले विषारी घटक भातातच राहतात. त्यामुळे असा भात खाल्ल्याने अन्नातून विषबाधा, उलट्या, जुलाब, पोटदुखी अशा समस्या उद्भवू शकतात. संशोधनातही (fridge)असे दिसून आले आहे की जर भात शिजवल्यानंतर लगेच फ्रिजमध्ये ठेवला नाही तर त्यात जीवाणूंची वाढ झपाट्याने होते आणि तो अन्न आरोग्यास अपायकारक बनतो.

तसेच पुन्हा गरम केल्याने भातातील पोषक घटक नष्ट होतात, ज्यामुळे तो कमी पचतो आणि पचनासंबंधी त्रास निर्माण होऊ शकतो. विशेषतः ज्यांना बद्धकोष्ठता किंवा पोटाचे विकार आहेत, त्यांनी असा भात खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार भात शिजवल्यानंतर लगेच खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे. जर ठेवावाच लागला तर तो 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नये आणि पुढील दिवशी गरम करून न खाण्याची काळजी घ्यावी.
हेही वाचा :
एकीकडे सुनांची हत्या, आत्महत्या.. तर दुसरीकडे मिथुन चक्रवर्तींचं सुनेशी असं नातं
भारताला धक्का, परदेशातील एकमेव Airbase झाला बंद
सोने, चांदी तब्बल ‘इतक्या’ हजारांनी झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर
