मुंबईतील पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये घडलेल्या १७ मुलांच्या ओलीस प्रकरणानंतर संपूर्ण शहर हादरले आहे. या धक्कादायक घटनेत रोहित आर्यानं तब्बल १७ निरागस मुलांना ओलीस ठेवले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व मुलांची सुरक्षित सुटका केली. सुटकेपूर्वी रोहितनं स्वतःचा व्हिडिओ(room) शूट करून आपल्या मागण्या मांडल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा एन्काऊंटर करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

या मुलांमध्ये कोल्हापूरहून ऑडिशनसाठी आलेल्या मंगल पाटणकर आणि त्यांच्या नातीचाही समावेश होता. मंगल पाटणकर यांनी सांगितले की, “ऑडिशनसाठी बोलावलं म्हणून आम्ही कोल्हापूरहून मुंबईत आलो. दोन दिवसांनी शुटिंग होईल असं सांगण्यात आलं होतं. रोहित आमच्याशी सुरुवातीला अगदी नम्रपणे बोलत होता, पण नंतर त्यानं अचानक आम्हाला एका खोलीत बंद करून (room)घेतलं आणि बाहेरचं दार लॉक केलं.”
त्यांनी पुढे सांगितले की, “शाळेतर्फे ऑडिशनसाठी बोलावलं गेल्याने आम्ही कोणताही संशय न बाळगता मुंबईत आलो. मुलांच्या पालकांनाही त्यानं सोबत बोलावलं आणि सर्वांना चांगलं वागवलं. पण त्या दिवशी त्यानं मुलांना एका खोलीत पाठवलं आणि पालकांना बाहेर थांबायला सांगितलं. त्यानंतर आम्हाला बाहेरून दरवाजाला कुलूप लावल्याचं लक्षात आलं.”

मंगल पाटणकर यांची आणि इतर सर्व मुलांची सुटका झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, रोहित आर्यने नेमकं हे सर्व का केलं याचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा :
फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच
IND W vs AUS W या एकाच सामन्यात झाल्या 781 धावा…
एकीकडे सुनांची हत्या, आत्महत्या.. तर दुसरीकडे मिथुन चक्रवर्तींचं सुनेशी असं नातं
