बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आई सुनंदा शेट्टी यांच्या प्रकृतीबाबत (health)चिंताजनक बातमी समोर आली आहे. तब्येत बिघडल्यामुळे सुनंदा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत बिघडल्याची बातमी कळताच शिल्पा शेट्टीने तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयाबाहेर शिल्पा शेट्टीचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

शिल्पा रुग्णालयात पोहोचताना आणि बाहेर पडताना अत्यंत चिंताग्रस्त दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आईच्या प्रकृतीबद्दल काळजी स्पष्ट दिसत होती. त्याचवेळी अभिनेत्री मलायका अरोराही आपल्या मुलगा अरहानसह लीलावती रुग्णालयात पोहोचली. मलायका आणि अरहान दोघेही मास्क घालून हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसले, आणि त्यांच्या उपस्थितीमुळे शिल्पाला नैतिक आधार मिळाल्याचे सांगितले जात आहे.
सध्या शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांकडून तिच्या आईच्या लवकर प्रकृती(health) सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी “देव तिच्या आईला लवकर बरे करो” आणि “आमच्या शुभेच्छा शिल्पा आणि तिच्या कुटुंबासोबत आहेत” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर ६०,००० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात दोघांविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना देशाबाहेर प्रवास करण्यास मनाई आहे. शिल्पाने परवानगीसाठी केलेली याचिका अलीकडेच न्यायालयाने फेटाळल्याची माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत आईची तब्येत बिघडल्यामुळे शिल्पा शेट्टी आणखी चिंतेत असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा :
फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच
IND W vs AUS W या एकाच सामन्यात झाल्या 781 धावा…
एकीकडे सुनांची हत्या, आत्महत्या.. तर दुसरीकडे मिथुन चक्रवर्तींचं सुनेशी असं नातं
