नागपुरात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची(student) हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या वादातून विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. नूर नवाज हुसेन असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तर खिलेश्वर बीसेन असं मुख्य आरोपीचं नाव आहे. यामध्ये चार आरोपी असून एक अल्पवयीन आहे.

नागपुरातील पारडी परिसरातील एच बी टाऊन परिसरात काल रात्री उशिरा दोन विद्यार्थ्यांच्या(student) गटात भांडण होऊन एकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. सिनियर आणि ज्युनिअर असा वाद असल्याचं पोलीस सांगत आहेत. मात्र हा वाद एका मुलीवरुन झाल्याचं बोललं जात आहे. बिसेन याच्यासोबत आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूर आणि आरोपी यांच्यात ज्युनिअर सिनियर वरुन वाद सुरू होता. आणि हा वाद मिटवण्यासाठी एचबी टाऊन या ठिकाणी हे सगळे एकत्र आले होते. पण वाद मिटण्याऐवजी विकोपाला गेला. बिसेन याने चाकूने वार करत नूरला गंभीर जखमी केलं. त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये नेलं असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस तात्काळ तेथे हजर झाले आणि त्यांनी सर्व आरोपींना अटक करून चौकशी करत पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

S*x Toy अन् तसले व्हिडिओ…; लंडनहून यायचा अन् 10 वर्षांच्या चिमुरडीसोबत…

राजकीय पटावर आजचा दिवस गाजणार! मतचोरी विरोधात वादळ पेटणार

निवडणुका लढवू इच्छिणाऱ्यांना मोठा झटका; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *