छत्तीसगड राज्यातून मानवी संवेदना हादरवणारी घटना समोर आली आहे. सीतापूर पोलीस स्टेशन परिसरात एका 23 वर्षीय तरुणीवर तिच्याच मित्राने बलात्कार(raped) केला आहे. फिरायला नेण्याच्या बहाण्याने तरुणीला एका निर्जन परिसरात नेऊन तिच्यावर जबरदस्ती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छत्तीसगडमधील चालता गावातील हर्रतिक्रा परिसरात घडली. आरोपी इंदल साई किंडो (वय 24) हा पीडितेचा परिचित होता.

त्याने तिला फिरायला येण्यास भाग पाडले आणि विश्वासात घेऊन एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे पोहोचताच आरोपीने पीडितेवर जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या नकारानंतरही आरोपीने तिला धमकावले, प्रतिकार केल्याने तिच्यावर मारहाण केली आणि घटनेनंतर तिला जवळच्या नाल्यात ढकलून घटनास्थळावरून फरार झाला.
या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने आपल्या कुटुंबीयांना फोन करून सर्व माहिती दिली. त्वरित गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.पीडितेच्या जबाबाच्या आधारे आरोपी इंदल साई किंडोविरुद्ध बलात्कार(raped), हल्ला आणि धमकी यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवून पोलिसांनी तातडीने एक विशेष पथक तयार केले आणि आरोपीला अटक केली.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भय आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत.
हेही वाचा :
सत्तेविरुद्ध सत्याचा मोर्चा आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह?
ऊस चाऊन खाताय की रस पिताय? आरोग्यास अधिक प्रभावी काय, घ्या जाणून
iPhone यूजर्ससाठी धक्का…