आंध्र प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात(temple) चेंगराचेंगरीझाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. असंख्य भाविक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वेगाने बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात(temple) एकादशीनिमित भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याने रेलिंग तुटले. यामध्ये 8 महिला आणि 2 लहान मुले अशा 10 भविकांचा मृत्यू झाला आहे. 25 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु: ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याब घटनेची दखल घेतली आहे. तसेच केंद्र सरकारने मदत देखील जाहीर केली आहे. मृतांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमी नागरिकांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंदिरात भाविकांची गर्दी अचानक वाढल्याने तेथे चेंगराचेंगरी निर्माण झाली. यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

हेही वाचा :

सणांच्या धामधुमीत GST कलेक्शनमध्ये उसळी! 

महाराष्ट्राला आता सांगायची किंवा जाहीर करायची गरज नाही, युती झाली? 

UPI पेमेंटचे नियम बदलले, ३ नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ नवे बदल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *