डिजिटल पेमेंटचा वापर वाढला असला तरी, अनेक ठिकाणी आजही रोख रकमेची गरज भासते, ज्यामुळे एटीएम(ATM) महत्त्वाचे ठरते. पण एटीएम मशीनचा उपयोग फक्त पैसे काढण्यापुरता मर्यादित नाही. पूर्वी एटीएमचा वापर प्रामुख्याने पैसे काढणे किंवा जमा करणे यासाठीच होत असे, पण आता एकाच मशीनद्वारे अनेक बँकिंग सेवांचा लाभ घेता येतो, ज्यामुळे तुमचा बँकेत जाण्याचा वेळ वाचू शकतो.

खाते तपशील आणि निधी हस्तांतरण
एटीएमचा(ATM) सर्वात सोपा आणि जलद उपयोग म्हणजे तुमच्या खात्यातील शिल्लक तपासणे. तुम्ही फक्त कार्ड टाकून तुमच्या खात्यात किती पैसे आहेत हे पाहू शकता. तसेच, ‘मिनी स्टेटमेंट’ पर्यायाद्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील मागील ५ ते १० व्यवहारांचा तपशीलही लगेच मिळवू शकता, ज्यामुळे तुम्हाला खर्चाचा अंदाज येतो.
यासोबतच, काही बँका एटीएमद्वारे थेट एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची सुविधाही देतात. जर दोन्ही खाती एकाच बँकेतील असतील, तर ही प्रक्रिया अत्यंत जलद आणि सुरक्षितपणे पूर्ण होते, यासाठी बँकेत जाण्याची गरज भासत नाही.
सुरक्षा आणि इतर महत्त्वाच्या सेवा
सुरक्षेच्या दृष्टीने एटीएम अत्यंत उपयुक्त आहे. जर तुम्हाला तुमचा पिन कुणाला समजल्याचा संशय आला, तर तुम्ही बँकेत न जाता थेट एटीएम मशीनवरून तुमचा पिन बदलू शकता. तसेच, नवीन डेबीट कार्डसाठी पिन जनरेट करण्याची सुविधाही एटीएमवर उपलब्ध असते.
बँकेच्या कामांसाठी मोबाईल नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलायचा किंवा अपडेट करायचा असेल, तर काही बँका ही सुविधा थेट एटीएमवरून देतात. याशिवाय, अनेक बँका वीज, पाणी, गॅस किंवा मोबाईलची बिले भरण्याची सोयही एटीएमद्वारे पुरवतात. तसेच, तुम्हाला नवीन चेक बुकची गरज असल्यास, बँकेत अर्ज न देता तुम्ही एटीएममधूनच त्याची मागणी नोंदवू शकता.
हेही वाचा :
सणांच्या धामधुमीत GST कलेक्शनमध्ये उसळी!
महाराष्ट्राला आता सांगायची किंवा जाहीर करायची गरज नाही, युती झाली?
UPI पेमेंटचे नियम बदलले, ३ नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ नवे बदल