राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण २१ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य, महसूल, शिक्षण, न्याय, ग्रामविकास आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध विभागांनी राज्याच्या विकासाशी निगडित महत्त्वाचे निर्णय सादर केले.सार्वजनिक आरोग्य विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील नागरिकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत २४०० विविध आजारांना मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत २३९९ आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार तर गंभीर आजारांवर दहा लाख रुपयांपर्यंतच्या आर्थिक सहाय्याची तरतूद करण्यात आली आहे(scheme).

त्याचबरोबर नागपूर येथील एलआयटी (लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान) विद्यापीठाला पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी सात कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने सोलापूर आणि वाशिम जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना सवलतींसह मान्यता दिली, तर पुणे आणि पैठण येथे नवीन न्यायालये स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.मच्छिमार आणि मत्स्य व्यवसायिकांना दिलासा देत मत्स्यव्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देण्यात आला असून, बँकांकडून मिळणाऱ्या अल्पमुदतीच्या कर्जावर चार टक्के व्याजपरताव्याची सुविधा देण्यात आली आहे. अल्पसंख्याक विभागाने गुरुतेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमासाठी ९४ कोटी रुपयांचा निधी (scheme)मंजूर केला आहे.

याशिवाय, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून, नागरिकांना अधिक कार्यक्षम आणि विकेंद्रीकृत आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.या सर्व निर्णयांमुळे राज्यात आरोग्य, शिक्षण, न्यायव्यवस्था आणि ग्रामीण विकास क्षेत्रांमध्ये मोठा बदल घडून येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदेच फायदे, जाणून घ्या मोठी माहिती
मोदी सरकारचा ‘बँकिंग’ क्षेत्रातील मोठा प्लॅन…
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात उद्या ‘शितल चंद्रप्रकाश सोहळा’