हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला उब आणि पोषण देणाऱ्या भाज्यांमध्ये मुळा(radish) एक अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते. अनेक जण मुळा खायचा म्हटले की तोंड वाकडे करतात, पण हा साधा दिसणारा मुळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. हिवाळ्यात मुळ्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.

मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि त्वचेचा तेज टिकवून ठेवण्यास मदत करतात. तसेच मुळ्यातील जास्त प्रमाणात असलेले फायबर पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पोट हलके राहते.

हिवाळ्यात मुळ्याचा वापर विविध प्रकारे करता येतो — मुळ्याचे(radish) पराठे, कोशिंबीर किंवा सूप यांच्या स्वरूपात दररोजच्या आहारात त्याचा समावेश केल्यास आरोग्यदायी परिणाम दिसून येतात. सकाळच्या नाश्त्यात मुळ्याचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे थंडीत आरोग्य टिकवण्यासाठी मुळ्याचा आहारात नक्की समावेश करा.
हेही वाचा :
मोदी सरकारचा ‘बँकिंग’ क्षेत्रातील मोठा प्लॅन…
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात उद्या ‘शितल चंद्रप्रकाश सोहळा’
महायुती तुटणार? “… त्यांचे उपकार विसरू नका”; NCP चा आमदार थोरवेंना इशारा