15 ऑगस्ट स्वातत्र्यदिनाच्या दिवशी मटण विक्री बंद ठेवण्याचा निर्णय (municipalities)राज्यातील काही महापालिकांनी घेतला आहे, यावरून आता राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून सुरू आहे, या निर्णयाविरोधात विरोधकांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच लोकांच्या खाण्यावर गदा आणली जात आहे, (municipalities)हा नक्की कोणता स्वांतत्र्यदिन आहे, असा थेट सवालच राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. कोणी काय खावं काय खाऊ नये, याचा निर्णय सरकार किंवा महापालिकेनं करू नये असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नाही, हा निर्णय तत्कालीन काँग्रेसच्या काळातच झाला होता, असं म्हटलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं देखील या दिवशी मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत, यावर आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिक घेतली आहे.

त्यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की, उद्या माझ्या निवासस्थानी दुपारी एक वाजता मटण पार्टी आहे, ज्या महापालिकांच्या आयुक्तांनी मासं विक्रीचं तुगलघी फरमान काढलं आहे, त्या सर्व आयुक्तांना मी माझ्या पार्टीचं निमंत्रण देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मी पार्टीचं निमंत्रण देत आहे.(municipalities) ही पार्टी केवळ अशा लोकांना आठवण करून देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे, ज्यांना अजून स्वातंत्र्याचा अर्थ समजला नाही असं जलील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला
जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या