बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती,(bollywood)उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आर्थिक फसवणुकीचे आरोप झाले आहेत. मुंबईतील व्यापारी दीपक कोठारी यांनी शिल्पा आणि राज यांच्यासह आणखी एका व्यक्तीविरोधात तब्बल 60.4 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवण्यात आले आहे.
जुहू पोलिसांत गुन्हा, EOW कडे तपास : दीपक कोठारी हे लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन 2015 मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा विस्तार करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम घेतली होती. (bollywood)मात्र, या पैशांचा वापर व्यवसायासाठी न करता वैयक्तिक खर्चासाठी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर जुहू पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 2015 ते 2023 या कालावधीत दीपक कोठारी यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी पैसे दिले होते, परंतु त्यांचा गैरवापर झाला.

शिल्पा-राज यांचे प्रतिपक्षातील विधान : या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे वकील प्रशांत पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.,(bollywood) त्यांनी सांगितले की, हे प्रकरण पूर्णपणे जुने असून, यावर आधीच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल , मुंबई येथे सुनावणी होऊन 4 ऑक्टोबर 2024 रोजी निकाल लागला आहे. पाटील यांनी स्पष्ट केले की, हे आरोप पूर्णपणे दिवाणीस्वरूपाचे असून, यात कोणताही फौजदारी पैलू नाही.
त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कंपनी आर्थिक संकटात अडकल्यानंतर हा व्यवहार NCLT मध्ये दीर्घ कायदेशीर प्रक्रियेत गेला होता. ऑडिटर्सनी वेळोवेळी EOW ला सर्व कागदपत्रे आणि पुरावे सादर केले आहेत, तसेच संबंधित चार्टर्ड अकाउंटंटने गेल्या वर्षभरात 15 पेक्षा जास्त वेळा पोलिसांना माहिती दिली आहे.

‘बदनामीचा प्रयत्न’ असल्याचा दावा : प्रशांत पाटील यांनी पुढे सांगितले की, हा गुंतवणूक करार पूर्णपणे इक्विटी गुंतवणुकीचा होता आणि कंपनीला आधीच लिक्विडेशन ऑर्डर मिळालेला आहे. पोलिस विभागालाही हा आदेश सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व आरोप बिनबुडाचे असून, हे प्रकरण त्यांच्या अशिलांची प्रतिमा मलिन करण्याचा एक प्रयत्न आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला
जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या