तुमचं वाहन जर 2019 पूर्वीचं असेल आणि अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट(plates) बसवून घेतली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्टर झालेल्या सर्व वाहनांसाठी HSRP अनिवार्य केलं आहे. मात्र अजूनही लाखो वाहनधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा मुदतवाढ देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.सध्या परिवहन विभागाने स्पष्ट केलं आहे की 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत आहे, आणि त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, वाहनधारकांनी ही अंतिम मुदत लक्षात घेऊन तत्काळ प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा दंड भरण्याची वेळ येऊ शकते.

या प्रक्रियेसाठी आधीच तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. एप्रिल, जून आणि ऑगस्टनंतर आता नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंतचा कालावधी सरकारने दिला आहे. तरीही राज्यभरात अनेक वाहनधारकांनी अजून नंबर प्लेट बसवलेली नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रम आहे की सरकार पुन्हा एकदा मुदतवाढ देणार का?तथापि, मिळालेल्या माहितीनुसार याबाबत सध्या कोणतीही नवीन घोषणा झालेली नाही. त्यामुळे 30 नोव्हेंबरनंतर जर गाडीवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल, तर 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. जर अर्ज केला पण नंबरप्लेट बसवली नसेल तर 1 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या (plates)नावाखाली फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्स आणि एजंट्सविषयी परिवहन विभागाने इशारा दिला आहे. वाहनधारकांनी फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळावरूनच अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. चुकीच्या लिंकवरून पैसे भरल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे अधिकृत पोर्टलवरच ऑर्डर देणं सुरक्षित आहे.पूर्वी फिटमेंट सेंटर कमी असल्याने नंबर प्लेट बसवण्यात अडचणी येत होत्या, पण आता 20 पेक्षा जास्त अधिकृत फिटमेंट सेंटर उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना प्रक्रिया सोपी झाली असून, विलंब न करता नंबर प्लेट बसवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यातील केवळ 40 टक्के वाहनांवरच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली गेली आहे. त्यामुळे सरकारकडून आणखी एकदा मुदतवाढ मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही वाहनधारकांना आशा आहे की जानेवारी 2026 पर्यंत मुदत वाढवली जाईल, मात्र याबाबत अधिकृत निर्णय अजून झालेला नाही.30 नोव्हेंबरनंतर जर मुदतवाढ जाहीर झाली नाही, तर दंडात्मक कारवाई सुरू होईल. त्यामुळे सरकारकडून पुढील घोषणा होण्याची वाट पाहण्यापेक्षा आताच नंबर प्लेट बसवून घेणं हितावह ठरेल.

हेही वाचा :

शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात…

‘या’ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही…

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *