१६ प्रभागांतील ६५ जागांसाठी आरक्षण जाहीर – महिलांचा मोठा वाटा, अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीयांमध्ये ‘कही खुशी कही गम’
इचलकरंजी :महानगरपालिका निवडणुकीसाठी(elections) आज ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १६ प्रभागांतील एकूण ६५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

आरक्षण सोडतीनुसार,
अनुसूचित जाती-जमातींसाठी ६ जागा (त्यापैकी ३ महिला)
इतर मागासवर्गीयांसाठी १७ जागा (त्यापैकी ९ महिला)
सर्वसाधारण महिलांसाठी २१ जागा
अशा प्रकारे एकूण ३३ जागा महिलांसाठी आरक्षित ठरल्या आहेत.
आरक्षण जाहीर होताच विविध समाजघटकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींसाठी आनंदाचा तर काहींसाठी धक्क्याचा क्षण ठरला.
🔹 अनुसूचित जाती महिला (३ जागा)
प्रभाग क्र. १(अ), ७(अ), ३(अ)
🔹 अनुसूचित जाती (३ जागा)
प्रभाग क्र. ६(अ), ९(अ), १०(अ)
🔹 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (९ जागा)
प्रभाग क्र. १३(अ), ५(अ), ८(अ), ११(अ), १२(अ), १६(अ), ६(ब), ९(ब), १०(ब)
🔹 नागरिकांचा मागास प्रवर्ग (८ जागा)
प्रभाग क्र. २(अ), ४(अ), १४(अ), १५(अ), १(ब), ३(ब), ७(ब), १६(ब)
🔹 सर्वसाधारण महिला (२१ जागा)
प्रभाग क्र. १(क), २(ब), २(क), ३(क), ४(ब), ४(क), ५(ब), ६(क), ७(क), ८(ब),
९(क), १०(क), ११(ब), १२(ब), १३(ब), १४(ब), १४(क), १५(ब), १५(क), १६(क), १६(ड)
🔹 सर्वसाधारण प्रवर्ग (२१ जागा)
प्रभाग क्र. १(ड), २(ड), ३(ड), ४(ड), ५(क), ५(ड), ६(ड), ७(ड), ८(क), ८(ड),
९(ड), १०(ड), ११(क), ११(ड), १२(क), १२(ड), १३(क), १३(ड), १४(ड), १५(ड), १६(इ)
आरक्षण सोडतीनंतर शहरात चर्चा रंगली असून, आगामी निवडणुकीसाठी(elections) स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे नव्या दिशेने आकार घेण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा :
उच्च न्यायालयाजवळ कार स्फोटात 12 जणांचा मृत्यू…
क्रिकेटर शुभमन गिलची नातेवाईक आहे शहनाज? कनेक्शनवर सोडलं मौन
फक्त 101 रुपये खर्च करा, जिओ देईल Unlimited 5G डेटा, प्लॅन जाणून घ्या