देशाच्या राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने एकच खळबळ उडवून दिली आहे. सुरुवातीला ही घटना साधा गाडीचा स्फोट असल्याचं दिसत होतं, पण तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे धक्कादायक घातपाताचे धागेदोरे समोर येऊ लागले. तपासातून आता या प्रकरणाचं थेट विद्यापीठाशी कनेक्शन(connection) समोर आलं आहे, ज्यामुळे या प्रकरणाने नवा कलाटणी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटासाठी वापरलेली i-20 कार तब्बल 11 तास दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फिरत होती. या वाहनाचे अनेक CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. कधी ही कार विद्यापीठाबाहेर, तर कधी शहरातील प्रमुख भागात दिसत होती. पोलिसांना प्राथमिक तपासात ही कार अल फलाह विद्यापीठाच्या गेटसमोर उभी असलेली सापडली.

या कारच्या हालचालींचा तपास करताना पोलिसांना अल फलाह विद्यापीठाच्या CCTV फुटेजमध्ये कार स्पष्ट दिसल्याचं आढळलं. काही तासांपर्यंत ही कार तिथेच उभी होती. गाडी दहशतवादी उमर चालवत असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे, मात्र गाडीच्या मागील सीटवर कोण बसलं होतं, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत काही डॉक्टरांना अटक केली आहे. तपासात या स्फोटाचा थेट पुलवामा कनेक्शन(connection) असल्याचंही समोर येतंय. उमरच्या आईलाही पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या भावाकडून तब्बल 18 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. यातील संभाषण आणि डेटा तपासला जात आहे.
तपासातून समोर आलं आहे की हा मोठा घातपात करण्याचा कट रचला गेला होता. मात्र स्फोट घाईघाईत झाल्यामुळे नुकसान अपेक्षेपेक्षा कमी झालं. स्फोटाच्या वेळी i-20 कार लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये उभी होती. फुटेजनुसार, ही कार पहाटे 3.19 वाजता अल फलाह विद्यापीठाबाहेर दिसली आणि त्यानंतर सायंकाळी 6.48 वाजेपर्यंत लाल किल्ल्याजवळ पार्किंगमध्ये होती. कार पार्किंगच्या बाहेर आली आणि काही मिनिटांतच स्फोट झाला.या i-20 कारची सुरुवात दिल्लीतील मोहम्मद सलमान यांच्याकडून झाली होती. त्यांनी ही कार नदीम नावाच्या व्यक्तीला विकली. नंतर नदीमने ती रॉयल कार झोन या डिलरमार्फत पुढे विकली आणि अखेरीस ही कार उमर याने घेतल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून काही जखमी नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकासोबत राष्ट्रीय तपास यंत्रणाही तपासात सहभागी झाली आहे.

हेही वाचा :
अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, जुहू रुग्णालयात दाखल
दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक
हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश….