बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी वेगळ्या कारणासाठी. धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी गेलेला गोविंदा (health)अचानक बेशुद्ध पडल्याने जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. चक्कर आल्याने तो कोसळल्याची माहिती समोर आली असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता. धर्मेंद्र हे त्याला मुलासारखे मानतात. मात्र, तिथेच अचानक गोविंदाला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. लगेचच डॉक्टरांनी त्याला आपत्कालीन विभागात दाखल केले. सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी गोविंदासोबतच्या नात्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यांनी थेटपणे म्हटले होते की, “पुढच्या जन्मी मला गोविंदा पती म्हणून नको.” तसेच गोविंदा आपल्याला आर्थिक मदत करत नाही, असेही त्यांनी सांगितले होते.
याचदरम्यान, गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. सुनीता यांनीही या चर्चांवर भाष्य करत म्हटलं होतं की, “मी स्वतः त्याला रंगेहात पकडल्याशिवाय काही बोलणार नाही.” या वैयक्तिक वादाच्या पार्श्वभूमीवर अचानक तब्येत बिघडल्याने चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गोविंदाचे वकील बिंदल यांनीही त्याच्या रुग्णालयात दाखल होण्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “गोविंदाला हलकी चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची तब्येत सध्या स्थिर असून, काळजीचं कारण नाही.” काही दिवसांपूर्वी देखील गोविंदाला पायाला झालेल्या दुखापतीमुळे याच रुग्णालयात(health) दाखल करण्यात आलं होतं.बॉलिवूडमधील चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी सोशल मीडियावरून गोविंदाच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

हेही वाचा :
दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक
हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश….
बीटच्या सालींचे इतके फायदे तुम्हाला माहित नसतील…