अमरावतीतल्या बडनेरा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने लग्नसोहळ्याचा आनंद क्षणात भीतीत बदलला. साहिल लॉन येथे सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात स्टेजवरच नवरदेव(Groom) सुजलराम समुद्रेवर दोन तरुणांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला. आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असताना या हल्ल्याने सर्व पाहुण्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

या घटनेचा संपूर्ण थरार ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यात आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून गेले, तर नवरदेवाचे(Groom) वडील त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यावरही चाकूने वार करण्याचा प्रयत्न झाला. या सर्व घटनेने उपस्थित पाहुण्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुजलराम समुद्रेला तात्काळ रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर वधूला मोठा धक्का बसला आणि ती स्टेजवरच बेशुद्ध पडली. लग्नसोहळ्याचा उत्सव क्षणात शोकाकुल झाला. या हल्ल्यानंतर बडनेरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार जखमी सुजल समुद्रे हा तिलक नगर परिसरातील रहिवासी आहे. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

लहान ‘युजर्स’ची इन्स्टाग्राम, फेसबुक खाते लवकरच होणार बंद…

समंथाच्या घटस्फोटाबाबत वादग्रस्त टिप्पणी, अखेर मंत्र्याचा माफीनामा; नाग चैतन्यसह नागार्जुनही भडकलेले

आज सोनं पुन्हा झालं स्वस्त; दागिने खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा तोळ्याचा भाव

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *