सांगलीतील गारपीर परिसर मंगळवारी मध्यरात्री नंतर दुहेरी खुनाच्या (murder)घटनेने हादरला आहे. दलित महासंघाचे कार्यकर्ते उत्तम मोहिते यांच्यावर शा-या उर्फ शाब्या शाहरुख शेख या इसमाने तलवारीसारख्या धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर संतापलेल्या उत्तम मोहिते यांच्या पुतण्याने शेखवर प्रत्युत्तरात हल्ला चढवला, आणि त्यात शेखचाही जागीच मृत्यू झाला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिणामी, काही तासांच्या आत सांगलीत दोन मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक तपासात असे दिसून येत आहे की, मोहिते आणि शेख यांच्यातील जुन्या वैमनस्यातून ही दुहेरी हत्या घडली असावी. तथापि, ही घटना सुपारी किलिंगचा भाग होती का किंवा इतर कोणते व्यक्तिगत कारण यामागे दडले आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.या प्रकरणात किमान चार जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस दलाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

गारपीर परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे.या दुहेरी खुनामुळे(murder) सांगलीतील रात्रीची शांतता रक्तरंजित बनली आहे. पोलिसांकडून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून, पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत.

हेही वाचा :
दिल्लीतील स्फोटाचे धक्कादायक कनेक्शन उघड; थेट ‘या’ विद्यापीठाशी संबंध
शेअर बाजारात आज करा या स्टॉक्सची खरेदी, पैशांचा पाऊस पडेल
अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, जुहू रुग्णालयात दाखल