अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या तेलंगणातील काँग्रेस मंत्री कोंडा सुरेखा यांनी अखेर जाहीर माफी (comment)मागितली आहे. जवळपास वर्षभरानंतर मध्यरात्री त्यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट लिहित दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन आणि त्यांच्या कुटुंबाची माफी मागितली आहे. नागार्जुन यांनी त्यांच्या विरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला सध्या न्यायालयात प्रलंबित असून, या पार्श्वभूमीवर त्यांचा माफीनामा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

कोंडा सुरेखा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “नागार्जुन आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. जर माझ्या वक्तव्यामुळे(comment) त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनःपूर्वक माफी मागते आणि माझं वक्तव्य मागे घेते.” त्यांनी पुढे नमूद केले की, “माझ्या टिप्पण्या गैरसमजातून झाल्या, आणि मला त्याबद्दल खेद वाटतो.”ही संपूर्ण वादग्रस्तता तेव्हा निर्माण झाली होती, जेव्हा कोंडा सुरेखा यांनी बीआरएसचे नेते के.टी.आर. यांच्यावर टीका करताना नाग चैतन्य आणि समंथा यांच्या वैवाहिक जीवनाचा उल्लेख खोचक पद्धतीने केला होता. त्यांनी म्हटले होते की, “केटीआर यांच्यामुळेच नाग चैतन्यचा घटस्फोट झाला. एन. कन्वेन्शन हॉलवरील कारवाई टाळण्यासाठी नागार्जुन यांनी समंथाला केटीआर यांच्याकडे जाण्यास भाग पाडले.”
त्यांच्या या विधानानंतर प्रचंड वाद निर्माण झाला होता. अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नाग चैतन्य यांच्या चाहत्यांनी तसेच नागार्जुन यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सुरेखा यांनी समंथाची माफी मागितली होती, मात्र आता त्यांनी नागार्जुन यांच्या कुटुंबालाही जाहीर माफी (comment)मागून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.या वादानंतर नाग चैतन्यनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. “घटस्फोटाचा निर्णय हा आयुष्यातील सर्वात वेदनादायक निर्णयांपैकी एक आहे. काही लोक या वैयक्तिक निर्णयाचा गैरफायदा घेत आहेत, हे लज्जास्पद आहे,” असे म्हणत त्यांनी सुरेखा यांच्या वक्तव्याला “निराधार आणि हास्यास्पद” म्हटले होते.
सध्या या प्रकरणाचा मानहानी खटला न्यायालयात असून, सुरेखा यांच्या या जाहीर माफीनाम्यानंतर पुढील सुनावणीवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :
आज सोनं पुन्हा झालं स्वस्त; दागिने खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा तोळ्याचा भाव
महिला बनणार ठाणेदार! भाजपा, शिंदेसेना, पवार गटाला धक्का…
राजकीय नेत्याने केली मतांची मागणी, आजोबांनी झोळीत टाकला 1 रुपया मग जे घडलं…Video Viral