जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाकोद गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका गर्भवती pregnant()महिलेचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्राम मोरे हे पत्नी जान्हवीला माहेराहून घरी घेऊन जात असताना हा अपघात घडला.

अचानक टायर फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दुभाजकावर जाऊन आदळले. धडक इतकी भीषण होती की क्षणार्धात कारने पेट घेतला. सीट बेल्टमुळे दोघेही कारमध्ये अडकले. स्थानिकांनी आणि पोलीसांनी प्रयत्न करून पतीला बाहेर काढले, मात्र कारचे काच न फुटल्याने जान्हवीला वाचवता आले नाही.
जान्हवी मोरे ही पाच महिन्यांची गर्भवती (pregnant)होती आणि या दाम्पत्याचे केवळ एक वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तिच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेच्या वेळी जवळच वाहतूक पोलीस पंचनामा करण्यासाठी उपस्थित होते. अपघाताचा आवाज ऐकून त्यांनी तातडीने धाव घेतली, पण कारने काही क्षणांतच भीषण ज्वाला धरल्याने बचावकार्य कठीण झाले. अखेरीस पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून संग्राम मोरे यांना बाहेर काढले, मात्र जान्हवीचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
या भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून, तो पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. भरधाव वेग, टायर फुटणे आणि आगीचा वेगवान प्रसार यामुळे क्षणात एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून, वाहनाची स्थिती आणि तांत्रिक कारणांचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा :
लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार, जागीच कोसळली नवरी
शुभमन गिल, जयस्वालसह सुदर्शननेही मैदानात गाळला घाम…
लहान ‘युजर्स’ची इन्स्टाग्राम, फेसबुक खाते लवकरच होणार बंद…