भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १५९ धावाच करू शकला. या सामन्यात भारतीय (cricket)गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे. जसप्रीत बूमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान कुलदीप यादवने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरिसह कुलदीपने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात एक विशेष विक्रम रचला आहे. कुलदीप यादव हा भारतासाठी १५०+ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा भारतातील तिसराच डावखुरा गोलंदाज आहे. त्याच्या आधी रवींद्र जडेजा आणि झहीर खान यांनी ही किमया साधली होती. तसेच, कुलदीप हा भारतात १५० विकेट्स घेणारा दुसरा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे.

यामध्ये सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे कुलदीपन यादवने भारतात १५० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा भीम पराक्रम केला आहे, जी डावखुरा गोलंदाजम्हणून सर्वात जलद (cricket)कामगिरी आहे. कुलदीप यादवने केवळ ८७ डावांमध्ये ही किमया साधली आहे. एक गोष्ट इथे लक्ष्यात घ्यायला हवी की झहीर खानने १३५ डाव घेतले आणि जडेजाने ही कामगिरी २०० डावात डावखुरा गोलंदाज म्हणून भारतासाठी १५० आंतरराष्ट्रीय विकेट्स गाठल्या आहेत.
भारतातील डावखुरा गोलंदाजाने भारतासाठी १५०+ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज
३७७ – रवींद्र जडेजा (२०० डाव)
१९९ – झहीर खान (१३५ डाव)
१५०* – कुलदीप यादव (८७ डाव)
जसप्रीत बुमराहच्या आधी केली कमाल
जसप्रीत बुमराने भारतासाठी १५० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज बुमराहच्या आधी कुलदीप यादवने ही कामगिरी करून दाखवून आहे. बुमराहने आतापर्यंत भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १४८ विकेट्स काढल्या आहेत. अनिल कुंबळेने भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळेने भारतात खेळताना २०४ डावांमध्ये ४७६ आंतरराष्ट्रीय विकेट्स चटकावल्या आहेत.
यापूर्वी, शुक्रवारी कोलकाता येथे दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलदाजांनी हा निर्णय हाणून पाडला आणि दक्षिण आफ्रिका संघाला १५९ धावांवर गारद केले. भारताकडून जसप्रीत बूमराहने सर्वाधिक ५ विकेट्स, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत. तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली आहे.

हेही वाचा :
पराभव बिहारमध्ये, पण भूकंप महाराष्ट्रात, काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
शरद पवारांना एकापाठोपाठ २ सर्वात मोठे धक्के!
काळे डाग पडलेले कांदे खाताय? आजच व्हा सावध, किती धोकादायक आहेत घ्या जाणून