स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी(customers) मोठी माहिती समोर आली आहे. बँकेने नोव्हेंबर महिन्यात दोन महत्त्वाच्या तारखांकडे ग्राहकांनी विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. 16 नोव्हेंबर रोजी SBI ने सिस्टम मेंटेनन्समुळे अनेक सेवा तात्पुरत्या बंद केल्या होत्या. याचा परिणाम UPI, IMPS, YONO, इंटरनेट बँकिंग, NEFT आणि RTGS सारख्या डिजिटल सेवांवर झाला होता. मात्र आता आणखी एक मोठा निर्णय घेत SBI ने 1 डिसेंबरपासून एक महत्त्वाची सेवा कायमस्वरूपी बंद करण्याची घोषणा केली आहे.

16 नोव्हेंबर रोजी पहाटे 1:10 ते 2:45 या वेळेत SBI च्या प्रमुख डिजिटल सेवांवर तात्पुरता परिणाम झाला. एटीएम सेवा देखील सुमारे एक तास बंद होती. बँकेने याबाबत ग्राहकांना आधीच सूचित केले होते. मात्र ही तात्पुरती अडचण आता संपली असली तरी पुढील बदल ग्राहकांवर थेट प्रभाव टाकणारे आहेत. कारण 30 नोव्हेंबरनंतर एक सेवा कायमची बंद होणार आहे, ज्याचा वापर काही ग्राहक नियमित करत होते.
SBI ने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे की 1 डिसेंबर 2025 पासून mCASH सेवा पूर्णपणे (customers)बंद होणार आहे. 30 नोव्हेंबरनंतर ही सुविधा ऑनलाईनएसबीआय किंवा YONO Lite वर उपलब्ध राहणार नाही. mCASH ही अशी सुविधा होती ज्याद्वारे ग्राहक फक्त मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून जलद पैसे पाठवू शकत होते. लहान-मोठ्या व्यवहारांसाठी अनेकांना ही सेवा उपयुक्त ठरत होती. मात्र आता बँकेने ही सेवा कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बँकेने त्यांच्या वेबसाइटवर आणि नोटिसद्वारे ग्राहकांना याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी ही जुनी सेवा बंद करून आता UPI, NEFT, IMPS आणि RTGS सारख्या आधुनिक, सुरक्षित आणि वेगवान प्रणालींचा वापर वाढवण्याचा उद्देश SBI ने व्यक्त केला आहे. त्यामुळे mCASH वापरणारे ग्राहक 30 नोव्हेंबरपूर्वी पर्यायी सेवांचा वापर सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
SBI ने सांगितले आहे की mCASH ही तुलनेने जुनी प्रणाली आहे आणि आधुनिक सुरक्षा निकषांनुसार आता ती अपुरी ठरत आहे. दिवसेंदिवस डिजिटल व्यवहारांची संख्या वाढत असल्याने अधिक मजबूत, जलद आणि सुरक्षित तंत्रज्ञान वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे mCASH सेवा बंद करून ग्राहकांना अधिक सुरक्षित प्लॅटफॉर्मकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये UPI हा सर्वात वेगवान आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट पर्याय असून देशभरात मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. तसेच IMPS आणि NEFT हे देखील मजबूत आणि विश्वसनीय पर्याय आहेत. त्यामुळे आगामी काळात mCASH बंद करून बँकेचा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अधिक सुरक्षित आणि अद्ययावत करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.

हेही वाचा :
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये मोठा राडा..
अमित ठाकरे संकटात! निवडणूक दृष्टीक्षेपात असतानाच मिळाला धक्का
आजचा सोमवार ‘या’ राशींसाठी भाग्यशाली…