भारत विरुद्ध पाकिस्तान सामना(match) असेल आणि राडा होणार नाही, असं क्वचितच होतं. नुकत्याच पार पडलेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तान खेळाडुंशी हस्तांदोलन न केल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर ट्रॉफी पाकिस्तानकडेच ठेवल्यानेही दोन्ही टीममध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यानंतर आता ज्युनियर टीम्सच्या सामन्यातही गरमागरमीचे वातावरण पाहायला मिळाले. टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए मॅचमध्ये राडा पाहायला मिळाला. पंचांच्या निर्णयानंतर टीम इंडियाच्या खेळाडुंचे चेहरे रागाने लाल झालेले दिसले. काय घडला नेमका प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.

एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 च्या ग्रुप बी सामन्यात दोहा येथील वेस्ट एंड पार्क स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ संघ आमनेसामने आले. 16 नोव्हेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी कठीण ठरला. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पराभवानंतर आशिया कपमध्येही अपयश आले. पाकिस्तानच्या कर्णधार इरफान खानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 19 षटकांत 136 धावा केल्या, तर पाकिस्तानने 13.2 षटकांत 2 गडी गमावून विजय मिळवला. हा पराभव टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी धक्का देणारा ठरलाय.
भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्यने आक्रमक सुरुवात केली. प्रियांश 10 धावांवर बाद झाला, पण वैभवने नमन धीरसोबत 49 धावांची भागीदारी केली. 14 वर्षीय वैभवने(match) 28 चेंडूत 45 धावा केल्या. ज्यामध्ये 3 षटकार आणि 5 चौकारचा समावेश होता. पण सुफीयान मुकीमला कॅच देऊन तो तंबूत माघारी परतला. नमनने 35 धावा केल्या. त्यानंतर मधली फळी कोसळली. कर्णधार जितेश शर्माने 9 चेंडूत 5 धावा केल्या. आशुतोष शर्मा 0 वर, नेहल वधेरा 6 वर बाद झाले.
137 धावांचे सोपे लक्ष्य घेऊन पाकिस्तानची टीम मैदानात उतरली. सलामीवीर माझ सदाकतने 47 चेंडूत 79 धावा केल्या. ज्यामध्ये 4 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता. ज्यामुळे पाकिस्तानचा विजय सोपा झाला. 10 व्या षटकात सुयश शर्माच्या गूगलीवर सदाकतचा टॉप-एज नेहल वधेराने सीमावर पकडला. वधेराने उडी मारून चेंडू नमन धीरकडे दिला, जो त्याने सहज पकडला. टीम इंडियाने आनंद साजरा केला. सदाकतही डगआउटकडे निघाला. पण थर्ड अम्पायर मोर्शेद अली खान यांनी नवीन नियमांनुसार नॉट आऊट दिले. फील्डर पूर्णपणे बाहेर गेल्याने हा निर्णय देण्यात आला.
हा निर्णय टीम इंडियाच्या फॅन्सना खूपच चुकीचा वाटला. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, वधेराने सीम ओलांडण्यापूर्वी चेंडू सोडला होता, पण नियमांनुसार तो अमान्य ठरला. जितेश शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि इतर खेळाडूंनी पंचांशी तिखट शब्दांत वाद केला. यानंतर खेळ 5 मिनिटांसाठी खेळ थांबला होता. या राड्याटे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यात वैभवच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. वैभवला याआधी सदाकतचा सोपा कॅच सोडावा लागला होता, ज्यामुळे तो अधिक संतापला. या वादामुळे मॅच अधिकच रोमांचक झाली.
या राड्यामुळे पाकिस्तानला फायदा झाला आणि सदाकतने अर्धशतक ठोकून पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये नेले. यावेळी पुन्हा टीम इंडियाने हॅंडशेक नाकारला, ज्यामुळे तणाव वाढला. फलंदाजीतील अस्थिरतेमुळे टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानचा हा विजय त्यांच्या ज्युनियर टीमसाठी प्रेरणादायी ठरलाय.

हेही वाचा :
अमित ठाकरे संकटात! निवडणूक दृष्टीक्षेपात असतानाच मिळाला धक्का
आजचा सोमवार ‘या’ राशींसाठी भाग्यशाली…
आयपीएल 2026पूर्वी चेन्नई सुपर किंग्सने ‘या’ 9 खेळाडूंना केलं रिलीज!