अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला होता. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत (decision)असल्याचा उल्लेख करीत ट्रम्प यांनी हे टॅरिफ लावले होते. त्यांच्या मते, भारत व चीनकडून मिळणाऱ्या पैशांचा वापर रशिया युक्रेन युद्धासाठी करीत आहे आणि त्यामुळे युद्धविराम होत नाही. या भूमिकेमुळे संपूर्ण जगात टॅरिफ वॉरचे सावट निर्माण झाले होते.

मात्र आता परिस्थिती मोठ्या वेगाने बदलते आहे आणि भारतासाठी ही अत्यंत सुखद बातमी आहे. अमेरिकेमध्ये प्रचंड महागाई उसळली असून रोजच्या गरजेच्या वस्तू महाग झाल्याने नागरिकांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. याचा थेट फटका ट्रम्प यांना बसला असून नुकत्याच झालेल्या न्यूयार्क महापौर निवडणुकीतही याचा परिणाम दिसून आला. वाढत्या जनक्षोभामुळे अखेर ट्रम्प प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आता फळं, बीफ, कॉफी, चहा यांसारख्या महत्त्वाच्या खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर त्यांनी अधिकृत सहीही केली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेतील महागाई काही प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा आहे. तसेच इक्वाडोर, ग्वाटेमाला, अर्जेटिना व इतर देशांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.
या टॅरिफमुळे अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या, ज्याचा थेट फटका ग्राहकांना बसत होता. नागरिकांच्या या तीव्र नाराजीचा विचार करून ट्रम्प प्रशासनाला आपल्या धोरणात बदल (decision)करावा लागला आहे. त्यामुळे अमेरिकेतील आर्थिक दबाव काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
भारतासाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे लवकरच अमेरिकेतून भारतावर लावलेला 50 टक्के टॅरिफही मागे घेतला जाऊ शकतो. वाढत्या महागाईमुळे अमेरिकन बाजाराचा तोटा होत असून भारतावर लागू असलेल्या टॅरिफमुळे व्यापारात मोठी घसरण झाली आहे. परिणामी भारताचा चीन आणि रशियासोबत व्यापार वाढला असून अमेरिकेला आर्थिक धक्का बसत आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा संकेत दिले होते की भारतातून येणाऱ्या खाद्यपदार्थांवरील टॅरिफ पुन्हा विचारात घेतला जाऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीत अमेरिकन प्रशासनावर दबाव वाढत आहे आणि त्यामुळे भारताशी संबंधित टॅरिफ लवकरच शिथिल होण्याची शक्यता अधिक आहे. हा निर्णय झाल्यास भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये नवीन सकारात्मक बदल घडण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा :
होय, मी कट्टर भाजप समर्थक… अभिनेत्री निवेदिता सराफ बेधडक बोलल्या…
कोल्हापूरमध्ये गर्भवती महिला बांधावरून पाय घसरून पडली अन् रुग्णालयात नेताच मृत्यू
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, निवडणुकीआधीच काँग्रेसने घेतला मोठा निर्णय